शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘अटल चषक’तर्फे ज्येष्ठ फुटबॉल खेळाडूंचा सत्कार-स्पर्धा महाराष्टबाहेरही पोहोचेल : ५0 खेळाडूंचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:16 IST

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोटर्स डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह व नेताजी तरुण मंडळाच्यावतीने अटल चषक फुटबॉल स्पर्धेच्यावतीने शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकात सोमवारी सायंकाळी सुमारे ५० हून अधिक

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोटर्स डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह व नेताजी तरुण मंडळाच्यावतीने अटल चषक फुटबॉल स्पर्धेच्यावतीने शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकात सोमवारी सायंकाळी सुमारे ५० हून अधिक ज्येष्ठ फुटबॉल खेळाडूंचा जाहीर सत्कार करण्यात आला. कोल्हापूरची ही ‘अटल चषक स्पर्धा’ महाराष्टÑाबाहेरही पोहोचेल, अशी अपेक्षा यावेळी अनेक नेत्यांनी व सत्कारमूर्र्तींनी व्यक्त केली.

पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, फुटबॉल हा कोल्हापूरच्या आत्मियतेचा खेळ आहे. पेठा-पेठांतील खेळाडूत उत्साह ओसंडून वाहत असतो, त्यातून काही वेळा गालबोट लागते; पण ही परिस्थिती आटोक्यात आणण्याची किमया ज्येष्ठ खेळाडूंत असल्याने त्यांचा गौरव करणे उचित आहे. या फुटबॉल स्पर्धेतून फुटबॉल खेळाडूंसाठी स्वतंत्र निधी उभारून त्यांना खेळावेळी इजा झाल्यास या निधीचा उपयोग होईल, असाही विश्वास व्यक्त केला.

ज्येष्ठ फुटबॉल खेळाडू आप्पासाहेब वणिरे यांनीही पूर्वीचा आाणि आजचा फुटबॉल स्पर्धा, त्यातील बक्षिसांची संख्या याची तुलना केली; पण कोल्हापुरात फुटबॉल खेळाचा म्हणावा तितका विकास झाला नसल्याची खंत व्यक्त केली, राज्य शासनाने खेळाडूंसाठी नोकरीत ५ टक्के आरक्षण ठेवावे, अशी मागणी केली.शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी, ही ‘अटल स्पर्धा’ कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्राला बळ देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुमारे ५ लाखांचे बक्षीस देऊन खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे, असेही ते म्हणाले.प्रारंभी सूत्रसंचालन अशोक देसाई यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आप्पासाहेब वणिरे, गजानन इंगवले, बाबासाहेब इंगवले, चंद्रकांत साळोखे, भाऊ सुतार, आनंदा इंगवले यांच्यासह एकूण ५० ज्येष्ठ खेळाडूंचा जाहीर सत्कार झाला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, उपाध्यक्ष अजित राऊत, सदाभाऊ शिर्के, नेताजी तरुण मंडळाचे अध्यक्ष राजू साळोखे, माजी आमदार सुरेश साळोखे, आदी मान्यवर उपस्थित होते.कोल्हापूर स्पोर्र्टस् डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह व नेताजी तरुण मंडळाच्यावतीने ‘अटल चषक’ फुटबॉल स्पर्धेच्यावतीने कोल्हापुरातील उभा मारुती चौकात सोमवारी सायंकाळी सुमारे ५० हून अधिक ज्येष्ठ फुटबॉल खेळाडूंचा जाहीर सत्कार करण्यात आला. आप्पासाहेब वणिरे यांचा शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण व देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते सत्कार केला. यावेळी सुरेश जरग, अजित राऊत, संदीप देसाई, राजू साळोखे, सुरेश साळोखे आदी उपस्थित होते.