शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन म्हणजे धूळफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 02:44 IST

मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया; तोंडाला पाने पुसल्याची टीका

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी राज्यातील मेगाभरतीत मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची केलेली घोषणा ही निव्वळ धूळफेक असल्याची संतप्त प्रतिक्रिया या समाजातील अभ्यासकांकडून शुक्रवारी व्यक्त झाली. भरतीच्या कायदेशीर प्रक्रियेत अशा पद्धतीने आरक्षण देणे शक्यच नसल्याचे या अभ्यासकांचे म्हणणे आहे. मूळ समाजाला घटनात्मक आरक्षण देण्याबाबत चालढकल करणारे सरकार असले मधले मार्ग काढून या समाजाच्या तोंडाला पाने पुसत असल्याची टीकाही होत आहे.सकल मराठा मोर्चाचे संयोजक व इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, ‘मराठा समाज घटनात्मक आरक्षण मागत आहे; परंतु त्याकडे सोईस्कर कानाडोळा करून सरकार मात्र नोकरीत आरक्षण, विद्यार्थ्यांना वसतिगृहात सोय अशा गोष्टी करीत आहे. त्यातून आम्ही कसे या समाजाचे हितकर्ते आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न आहे; परंतु सरकारचा हा कावा न कळण्याजोगा मराठा समाज नक्कीच दूधखुळा नाही.गेल्या वर्षी मुंबईत ९ आॅगस्टला महामोर्चा निघाला. त्यामध्येही जी आश्वासने मुख्यमंत्र्यांनी दिली होती, त्यांतील एकाही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. मराठवाडा व इतर महाराष्ट्रातही सकल मराठा समाजाच्या वतीने जे नव्याने आंदोलनसुरू झाले आहे; त्यामागे हीच अस्वस्थता असल्याचे सावंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या १६ टक्के आरक्षणाच्या घोषणेला कायदेशीर आधार नाही. सरकारला खरेच मराठा समाजाला शासकीय नोकरीमध्ये संधी द्यावयाची असेल, तर आरक्षण मिळाल्यानंतर मेगा भरतीची प्रक्रिया राबवावी.- दिलीप पाटील, अध्यक्ष, क्षत्रिय मराठा चेंबर्स आॅफ कॉमर्सनिवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सध्या आश्वासनांची खैरात सुरु आहे. मुख्यमंत्र्याच्या घोषणेला कायदेशीर आधार नाही. जोपर्यंत विधीमंडळात यासंदर्भात कायदा मंजूर होत नाही तोपर्यंत या घोषणेला काही अर्थउरत नाही. - प्रा. मधुकर पाटील, संघटक, मराठा मोर्चा.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस