शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

मृत जनावरांसाठी पहिल्या टप्प्यात ७० लाखांची मदत- : शासनाकडे साडेतीन कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 01:25 IST

आतापर्यंत जिल्ह्णात मृत १४६ मोठी दुधाळ जनावरे, ५७ छोटी दुधाळ जनावरे, १२ ओढकाम करणारी मोठी जनावरे व छोटी ३ जनावरे असे मिळून ४२ लाख दोन हजार रुपये वाटप करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देमहापुरात २१५ जनावरे; १० हजार कोंबड्या दगावल्या

प्रवीण देसाई ।कोल्हापूर : महापुरात दगावलेल्या जनावरे व पक्ष्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील मदत वाटप सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत २१५ पाळीव छोटी-मोठी जनावरे व १० हजार कोंबड्यांसाठी सुमारे ७० लाख रुपये संबंधितांना वितरित केले आहेत. राज्य शासनाकडे मृत जनावरे व पक्ष्यांसाठी एकूण सुमारे साडेतीन कोटींची मागणी जिल्हा प्रशासनाने केली आहे.

गेल्या महिन्यात महापुराने थैमान घातले होते. यामध्ये मनुष्यहानी झाली नसली तरी पाळीव जनावरे, पक्षी, कोंबड्या मोठ्या प्रमाणात मृत झाल्या होत्या. त्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने तीन कोटी ४२ लाख ११ हजार रुपयांची मागणी केली आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने मदत येत आहे. दुधाळ मोठी जनावरे (गाय, म्हैस) यांच्यासाठी प्रत्येकी ३० हजार याप्रमाणे व ओढकाम करणारे (बैल, घोडा) यासाठी २५ हजार याप्रमाणे, दुधाळ छोट्या जनावरांसाठी (शेळ्या व मेंढया) तीन हजार रुपये, छोटे ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी (गाढव, खेचर) १६ हजार रुपये, तर कोंबड्यांसाठी प्रत्येकी ५० रुपये याप्रमाणे मदत निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार त्याचे टप्प्याटप्प्याने वाटप सुरू झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्णात मृत १४६ मोठी दुधाळ जनावरे, ५७ छोटी दुधाळ जनावरे, १२ ओढकाम करणारी मोठी जनावरे व छोटी ३ जनावरे असे मिळून ४२ लाख दोन हजार रुपये वाटप करण्यात आले आहेत.

 

  • निर्वाह भत्त्यासाठी ५४ लाखांची मागणी

महापुराच्या काळात स्थलांतरित झालेल्या जनावरांसाठीही शासनाने भत्ता निश्चित केला आहे. त्यानुसार छोट्या जनावरांसाठी प्रत्येकी ३४ रुपये व मोठ्या जनावरांसाठी प्रत्येकी ७० रुपयांप्रमाणे दिले जात आहेत. स्थलांतरित केलेल्या ९४ हजार पाळीव छोट्या-मोठ्या जनावरांसाठी निर्वाह भत्त्याकरिता ५४ लाख ९१ हजार रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील २७ लाख रुपये आले असून, त्याचे वाटप करण्यात आले आहे.

 

  • महापुरात ४५ हजार जनावरे, कोंबड्या मृत

महापुरामुळे जिल्ह्यातील ४४ हजार ३४९ कोंबड्या, ८०८ गायी व म्हशी, २७० शेळ्या व मेंढ्या, २३ बैल व घोडे, १७९ गाढव, खेचर, वासरू मृत झाले आहेत.

 

महापुरामुळे जिल्ह्यातील मृत जनावरे व पक्ष्यांसाठी मदत वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात आतापर्यंत सुमारे ७० लाख रुपयांची मदत वाटप केली आहे. शासनाकडे मदतीसाठी केलेल्या निधीच्या मागणीनुसार टप्प्या-टप्प्याने मदत येत आहे.- भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूर