शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा मतदान, मतमोजणी दिवशीची परीक्षा लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 11:36 IST

विधानसभा मतदान आणि मतमोजणी दिवशी होणाऱ्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने घेतला आहे. दि. २० ते २२ आॅक्टोबर दरम्यानच्या परीक्षांचा त्यामध्ये समावेश आहे. याबाबतची सूचना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने अधिविभाग आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील संलग्नित महाविद्यालयांना करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देविधानसभा मतदान, मतमोजणी दिवशीची परीक्षा लांबणीवरशिवाजी विद्यापीठाचा निर्णय; अधिविभाग, महाविद्यालयांना सूचना

कोल्हापूर : विधानसभा मतदान आणि मतमोजणी दिवशी होणाऱ्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने घेतला आहे. दि. २० ते २२ आॅक्टोबर दरम्यानच्या परीक्षांचा त्यामध्ये समावेश आहे. याबाबतची सूचना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने अधिविभाग आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील संलग्नित महाविद्यालयांना करण्यात येणार आहे.विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्रातील (प्रथम सत्र) परीक्षांचा प्रारंभ आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये होणार आहे. त्याचे वेळापत्रक परीक्षा व मूल्यमापन मंडळाने आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले. त्यानुसार बी. ए., बी. कॉम. आणि बी. एस्सी., एम. ए., एम. कॉम. आणि एम. एस्सी., बी. व्होक. पदवी, पदविका अभ्यासक्रमांच्या विविध सत्रांच्या एकूण ५९१ परीक्षा आॅक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत; मात्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक गेल्या आठवड्यात जाहीर आहे.

त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीचे मतदान आणि मतमोजणीच्या तारखा लक्षात घेऊन त्या दरम्यानच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. ज्या अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यातील या दिवशीचे पेपर त्या परीक्षांच्या अखेरीस घेतले जाणार आहेत.

या दिवशी परीक्षा नाहीतविधानसभा निवडणुकीच्या मतदान, मतमोजणी आणि दि. ९, १०, १६ आणि १७ नोव्हेंबर रोजी होणारी स्वयंम् परीक्षा, १८ नोव्हेंबर रोजी विद्यापीठ वर्धापनदिन, दि. २ आणि ९ नोव्हेंबर रोजी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा (राज्यसेवा), भारतीय कंपनी सचिव संस्थानतर्फे आयोजित कंपनी सेक्रेटरीजची परीक्षा दि. २८ व २९ डिसेंबर या दिवशी असल्याने संबंधित दिवशी विद्यापीठाच्या कोणत्याही परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या नाहीत.

विद्यापीठ आणि परिक्षेत्रातील महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विधानसभा निवडणुकीकरिता मतदान अधिकारी म्हणून निवडणूक आयोगाकडून नियुक्ती केली जाते. या नियुक्त केलेल्या मतदान अधिकाऱ्यांना मतदानाच्या एक दिवस अगोदर, मतदान तारीख आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या मूळ आस्थापनेवर हजर राहता येत नाही; त्यामुळे दि. २०, २१ आणि २२ आॅक्टोबर रोजी परीक्षा आयोजित करणे संयुक्तिक होणार नाही; त्यामुळे या कालावधीतील परीक्षा विद्यापीठाने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. दि. २३ आॅक्टोबरला परीक्षा होईल. दिवाळीच्या सुटीमुळे दि. २४ ते ३० आॅक्टोबर दरम्यान परीक्षा होणार नाही.- डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर