शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत आजी-माजी नगरसेवकांसह इच्छुक ॲक्टिव्ह मोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजी-माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार भागामध्ये ॲक्टिव्ह बनले आहेत. मतदारांच्या किरकोळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजी-माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार भागामध्ये ॲक्टिव्ह बनले आहेत. मतदारांच्या किरकोळ कामातही लक्ष घातले जात आहे. परंतु या सगळ्या प्रक्रियेकडे नागरिकांनी डोळसपणे पाहण्याची गरज आहे. कारण नगरपालिकेत सुमारे ७० टक्के आजी-माजी नगरसेवकच स्वत: किंवा कार्यकर्त्यांच्या नावाने ठेकेदार बनले आहेत. त्यामुळे टक्केवारी वाढून धोकादायक वळणावर जाऊन पोहोचली आहे. परिणामी कामाचा दर्जा अतिशय घसरला आहे.

निवडणूक जवळ आली की, उमेदवारांकडून मतदारांना आपलंसं करण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यासाठी त्यांचे किरकोळ शिधापत्रिकांचे काम असेल तरी ते करण्यासाठी खटाटोप केल्याचे दाखवले जाते. आपल्या भागातील सर्व अडचणींचा पाठपुरावा करून भाग सुजलाम् सुफलाम् करणारा ‘मसीहा’ आपणच असल्याचा आव आणला जातो. त्यामुळे नागरिकांची मानसिकता बदलते आणि निवडणुकीत अनेकवेळा असामाजिकत्व असलेली व्यक्ती निवडून येते. तो पुढे जाऊन आपल्या नातेवाईक अथवा कार्यकर्त्याच्या नावाने नगरपालिकेचा ठेकेदार बनतो. प्रत्येक कामात त्याचा हस्तक्षेप सुरू होतो. यामध्ये ‘कारभारी’ असणाऱ्या प्रमुखांना त्यांचा वाटा ठरवून दिला जातो. या सगळ्या प्रकारांमुळे नगरपालिकेची टक्केवारी वाढत जाऊन चक्क ५० टक्क्यांवर पोहोचल्याची चर्चा आहे. याचा विपरित परिणाम विकास कामांवर होतो. एखाद्या प्रामाणिक नगरसेवकाच्या भागात काम सुरू असेल आणि त्याने दर्जाबाबत विचारणा केल्यास आपलाच माणूस आहे, सांभाळून घ्या, अशा सूचना दिल्या जातात. यातूनही आवाज उठविल्यास दुसऱ्या कामात त्याला अडचण करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा कुरघोड्यांमुळे नगरपालिकेची स्थिती दिवसेंदिवस बिकट बनत आहे. यात सुधारणा व्हायची असेल, तर नागरिकांनीच आता डोळसपणे मतदान करणे आवश्यक आहे.

चौकट

ठेकेदारांची परिस्थिती तपासावी

विकास कामांत दर्जा अपेक्षित असेल, तर नगरसेवक किंवा त्यांचे नातेवाईक ठेकेदार नसावेत, अशा मार्गदर्शक सूचना आहेत. परंतु याला बगल देत आपल्या कार्यकर्त्यांच्या नावाने अनेकजण ठेका घेतात. संबंधित ठेकेदार कार्यकर्त्याची परिस्थिती पाहता, कोट्यवधींचा ठेका घेण्याची त्याची परिस्थिती नसल्याचे उघडकीस येईल. परंतु याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते.

प्रतिक्रिया...

नगरसेवक कार्यकर्त्यांच्या नावाने ठेकेदार बनत असल्याने नगरपालिकेतील टक्केवारीचा विषय गंभीर बनला आहे. परिणामी नगरपालिकेचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कामाचा दर्जाही घसरला आहे. याला आवर घालणे गरजेचे आहे.

- शशांक बावचकर- काँग्रेस प्रदेश सचिव तथा नगरसेवक, इ.न.पा.

फोटो ओळी

२४०९२०२१-आयसीएच-०८-पालिका इमारत