शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

गडकोट संवर्धनासाठी शासनाला जाब विचारणार

By admin | Updated: May 22, 2015 00:55 IST

युवराज संभाजीराजे यांचे प्रतिपादन : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीची नियोजन बैठक

कोल्हापूर : गडकोट संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना एकत्रित करण्याचे काम सुरू आहे. वेळीच राज्य शासनाने गडकोट किल्ल्यांबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यास शासनाला रोखठोक जाब विचारू, असे प्रतिपादन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्ग रायगड येथे ६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जुना राजवाडा, तुळजाभवानी मंडप येथे आयोजित नियोजन बैठकीत ते बोलत होते. संभाजीराजे म्हणाले, शिवराज्याभिषेक सोहळा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता तो राष्ट्रीय सण आणि लोकोत्सव व्हावा. याकरिता सोहळ्यात सहभागी होणाऱ्या मावळ्यांनी स्वयंशिस्त पाळावी. राज्यातील गडकोट संवर्धन होणेही तितकेच गरजेचे आहे. कारण हा इतिहास जर आजच्या पिढीला कळला नाही तर महाराजांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. हे विचार पोहोचण्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळा हे निमित्त आहे. राज्यातील गडकोटांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.कधी केंद्र शासनाकडे बोट दाखवायचे, तर कधी पुरातत्त्व खात्याचे भूत उभे करायचे, असा प्रकार करीत घोर फसवणूक केली आहे. यापुढे ती खपवून घेतली जाणार नाही. गडकोट संवर्धनासाठी राज्यातील सर्व दुर्गप्रेमी संस्था, व्यक्ती यांना एकत्रित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच शासनाला याबाबत रोखठोक जाब विचारला जाईल. औरंगाबाद येथे औरंगजेबाच्या पत्नीच्या मकबऱ्याचा ३९ वेळा जीर्णोद्वार करण्यात आला आहे; तर शिवरायांच्या समाधीचा केवळ दोन वेळाच जीर्णोद्वार करण्यात आला आहे. असा दुजाभाव शासनाने केला आहे. याकरिता मुंबई, पुणे, नाशिक, उस्मानाबाद, औरंगाबाद, विदर्भ, आदी ठिकाणच्या संस्था प्रतिनिधींची समिती स्थापून सरकारवर दबावगट निर्माण केला जाईल. शिवराज्याभिषेकाच्या माध्यमातून मला केवळ मराठ्यांचे नेतृत्व करायचे नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे नेतृत्व करायचे आहे. शिवराज्याभिषेक समितीच्या नूतन अध्यक्षपदी सागर यादव यांची निवड संभाजीराजे यांनी केली. यावेळी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, फत्तेसिंह सावंत, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, किशोर घाटगे, नगरसेवक विनायक फाळके, ‘छावा’चे राजू सावंत, मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, संपतराव चव्हाण, राजू मेवेकरी, आदी उपस्थित होते.