शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनीचे धड पेटीत, अवयव फ्रीजमध्ये : खुनाची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:53 IST

कळंबोली : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांचा खूनच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देआरोपींच्या कोठडीत वाढ; बेपत्ता अश्विनी बिद्रे प्रकरणाचा लागला छडा

कळंबोली : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांचा खूनच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर याचा मित्र महेश पळणीकर यानेच ही कबुली दिली आहे. अश्विनी यांची हत्या करून लाकूड कापण्याच्या मशीनने मृतदेहाचे तुकडे करून ते वसईच्या खाडीत फेकण्यात आले.'

अश्विनी यांचा खून करून धड पेटीत आणि इतर अवयव फ्रीजमध्ये ठेवले होते, अशी माहिती समोर आली आहे. शुक्रवारी न्यायालयाने कुंदन भंडारी व महेश पळणीकर यांना अनुक्रमे ५ आणि ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.अश्विनी यांचे अपहरण करून हत्या केल्याच्या संशयावरून नवी मुंबई पोलिसांनी ठाणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला अटक केल्यानंतर एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील यालाही अटक केली होती. कुरुंदकर याला चालक भंडारीने मदत केल्याचा संशय असल्याने पोलिसांनी त्यालाही अटक केली होती. भार्इंदर येथून ज्या दिवशी अश्विनी बिद्र्रे बेपत्ता झाल्या, त्या दिवशी मध्यरात्री भंडारीच्या मोबाइलचे लोकेशनसुद्धा त्याच परिसरात असल्याचे आढळले होते. पुण्याहून रात्री उशिरा आल्याने भार्इंदर येथील बंटास हॉटेलमध्ये मुक्काम केल्याचे त्याने सांगितले होते.लाकूड कापण्याच्या मशीनने तुकडेपळणीकरने घडलेला प्रकार कथन केल्याने अश्विनी यांचा खून झाल्याचे निष्पन झाले. कुरुंदकर यांनी अश्विनी यांचा त्यांच्या घरी खून केला व लाकूड कापण्याच्या मशीनने तुकडे केले. धड घरातील पेटीत एक दिवस ठेवले. डोके, हात, पाय तोडून ते काही काळ फ्रीजमध्ये ठेवल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, अवयव काही तासांत कुरुंदकर व त्याच्या चालकाने खाडीत फेकले.अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे तुकडे नेमके कुठे टाकले याची माहिती घेण्याकरिता नौदलाची मदत घेतली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी शुक्र वारी न्यायालयात दिली.कुंदन भंडारीच्या पत्नीने हात जोडलेशुक्र वारी न्यायालयात आरोपी कुंदन भंडारीची पत्नी आली होती. पतीला पाहून तिला रडू आवरले नाही. न्यायालयाच्या दारात हात जोडून ती पतीकरिता प्रार्थना करीत होती.