शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

पशुपक्ष्यांचा तारणहार आशुतोष-

By admin | Updated: November 6, 2016 01:15 IST

- अवलिया

आशुतोषच्या मोबाईलची रिंग्ां वाजली की, समजायचे कुणाच्यातरी घरी किंवा अडगळीत साप नाही तर कुठेतरी पक्षी जखमी असणार. जणू याच कामासाठी तो मोबाईल वापरतो. क्षणाचाही विचार न करता गाडी काढायची आणि थेट ते ठिकाण गाठायचे. तेथे पोहोचताच त्या परिसराचा तो ताबाच घेतो. कारण त्या प्राणी वा पक्ष्याला कोणत्याही प्रकारची इजा होऊ द्यायची नाही, असा त्याचा अलिखित नियम आहे. मग त्या जीवाला अलगद ताब्यात घेऊन कुठे जखम वगैरे झाली असल्यास घरी अथवा डॉक्टरांकडे नेऊन त्याच्यावर उपचार करायचा. बरे झाल्याची खात्री करून दाजीपूर, पन्हाळ्यासारख्या अधिवासात त्याला सोडून यायचे. इतके जिवापाड प्रेम आशुतोष त्या जिवांवर करतो. यासाठीचा खर्च स्वत:च भागवितो. आतापर्यंत त्याने दोन ते अडीच हजार साप, वेगवेगळे पक्षी, प्राणी यांना जीवदान दिलेले आहे. नावात ‘तोष’ (आनंद) असणाऱ्या अवलियाने या कार्यात स्वत:ला झोकूनच दिले आहे. शिक्षण बी. कॉम.पर्यंत, झाले असले तरी रेडियम तसेच कॉम्प्युटरवर डिझाईनचे काम करतो. पशुपक्ष्यांच्या प्रेमापाटी त्याने नोकरीच्या बंधनात न अडकण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यासाठी जणू त्याने २४७७ पॅटर्न राबविला आहे. अनुभव कथन करताना त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच भाव होता. दोन ते तीन वर्षांपूर्वी वाट चुकलेले सांबर रिग्ांरोडवर आले होते. हे समजताच ग्रुपसह तेथे पोहोचलो. पाहतो तर काय गर्दीमुळे पळून सांबराची दमछाक झाली होती. कसेबसे गर्दीला हटवून चोहोबाजूंनी घेरून त्याला पकडले. नंतर वैद्यकीय उपचारासाठी नेले, पण दवाखान्यात त्याचा दमछाकीमुळे मृत्यू झाला. आपल्या प्रयत्नांना यश न आल्याने खूपच दु:खी झालो.असेच एकदा लक्ष्मीपुरीतील रिलायन्स मॉलजवळ असलेल्या मोठ्या झाडावर वटवाघूळ पतंगाच्या नायलॉन दोऱ्यात अडकून फसले होते. तीन दिवसांनी ते नजरेस पडले. अडचणीमुळे त्या झाडावर चढणे आव्हानात्मक होते, पण त्याला वाचवायचे या निश्चयावर ठाम असल्यामुळे अग्निशामन दलाच्या साहाय्याने प्रयत्नांची पराकष्ठा करून वटवाघळापर्यंत पोहोचलो. त्याला अलगद खाली उतरविले. उपाशीपोटी राहिल्यामुळे त्याच्या अंगात त्राण राहिले नव्हते. त्याला प्रथम खायला घातले आणि दुसऱ्या दिवशी छोटेसे आॅपरेशन करून त्याला त्या दोऱ्यातून मुक्त केले. पूर्णत: बरे झाल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. रजपूतवाडीत गेल्यावर्षी थरारक अनुभव आला. एका घराच्या परसात धामीण असल्याचे समजले. तातडीने तेथे पोहोचलो. तोपर्यंत ती धामीण जळणासाठी ठेवलेल्या लाकडात शिरली. एक एक लाकूड बाजूला काढेल तसे ती पुढे सरकू लागली. तिला पकडणे अवघड झाले. तरी तिची शेपूट धरली, पण तिने लाकडाला वेटोळे घातल्यामुळे ताकद अपुरी पडू लागली. तिला इजा होऊ नये म्हणून सोडताच तारेच्या कुंपणापलीकडे तिने धाव घेतली. त्या सरशी तिला पकडताना मी त्या कुंपणावर जाऊन आदळलो. जखमी अवस्थेत तिला पकडण्याचा प्रयत्न केला, पण सुमारे नऊ फूट असलेल्या धामीणीची ताकदही खूप होती. शेवटी ती एका बिळात शिरली. तरीही हार न मानता धोका पत्करून तिला पकडले व पन्हाळ्यावर झाडीत सोडून दिले. पशुपक्ष्यांवरील जिवापाड प्रेमापोटी पहिल्याच हाकेला ओ देणाऱ्या या अवलियास सर्पमित्र म्हणून कोल्हापूरसह परिसर ओळखतो. गेली १0 ते १५ वर्षे तो या कार्यात सक्रिय आहे. लहानपणी ट्रेकिंगला गेल्यामुळे प्राणी, पक्ष्यांशी ओढ निर्माण झाल्याचे तो सांगतो. त्याने जीवदान दिलेल्यांमध्ये घुबड, घार, बामणी घार, कापशी घार, पॅराडाईज फ्लाय कॅचर, स्वॉलो बर्ड, कबूतर, पोपट, वटवाघूळ, बगळे, ससा, साप आदींचा समावेश आहे. बेडकांवरील अभ्यास करण्यास खूपच आवड असल्यामुळे त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरून त्यांची तो माहिती घेतो. आंबोली हे ठिकाण बेडकांसाठी प्रसिद्ध असल्यामुळे तेथेही जाऊन त्यांचा तो अभ्यास करतो.देवेंद्र भोसले, करण भोसले, शरद जाधव, विशाल शिंदे, रवी सूर्यवंशी, नितीन ऐतवडेकर आणि अभिजित शिंदे हे त्याच्या ग्रुपचे सदस्य आहेत. साताऱ्याचे डॉ. अमित सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली ते कार्य करत आहेत. जखमी पक्षी, सापांवर उपचार करण्यासाठी कोल्हापुरातील डॉ. संजय बागल हे नेहमीच मदत करतात.आशुतोष विजय सूर्यवंशी -- अवलिया- भरत बुटाले, --कोल्हापूर.