जयसिंगपूर : संस्था या निर्माण करण्यापेक्षा त्या योग्यरीतीने चालवण्याची कसब असणे गरजेचे असून अशोकराव माने यांनी स्वकर्तृत्वावर निर्माण केलेला हा उद्योग परिवार नक्कीच अभिमानास्पद आहे. तमदलगेसारख्या ग्रामीण भागात सूतगिरणीसारखा उद्योग उभा करून हजारो हातांना काम देण्याचे कार्य त्यांनी केले आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री व वारणा उद्योग समूहाचे प्रमुख आ. डॉ. विनय कोरे यांनी केले.
तमदलगे (ता. शिरोळ) येथील दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीस आ. डॉ. कोरे यांनी रविवारी सदिच्छा भेट दिली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, जि.प. सदस्य दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी त्यांचे स्वागत करून संस्थेच्या प्रगतीचा आढावा विषद केला. यावेळी आ. डॉ. कोरे यांचा जि. प. सदस्य प्रसाद खोबरे व संदीप कारंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास वडगावचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी, रवींद्र जाधव, बाळासाहेब कळंत्रे, संचालक जितेंद्र चोकाककर, चिंतामणी निर्मळे, कार्यकारी संचालक दिलीप काळे, दिलीप माळी, स्वामी समर्थचे कार्यकारी संचालक सुहास राजमाने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फोटो - २५०४२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - तमदलगे (ता. शिरोळ) येथे आ. डॉ. विनय कोरे यांचा डॉ. अशोकराव माने यांनी सत्कार केला. यावेळी मोहनलाल माळी, रवींद्र जाधव, जितेंद्र चोकाककर, सुहास राजमाने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.