शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

अशोकअण्णांची ‘गुगली’, इच्छुकना ‘धडकी’

By admin | Updated: April 13, 2016 00:15 IST

आजरा कारखाना : आघाड्यांचे चित्र अस्पष्ट; नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचाही विचार

ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा --रविवारच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जिल्हा बँकेचे संचालक अशोकअण्णा चराटी यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली, परंतु त्याचबरोबर मुश्रीफ यांच्यासारखी कामे करणारा जिल्ह्यात दुसरा नेता नाही. जिल्हा बँक कारभारात तर त्यांचे योगदान अभिनंदनीय आहे, असे जाहीर गौरवोद्गार काढल्याने सत्तारूढ राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रस विरोधात अशोकअण्णा आघाडी उभारणार आणि त्यातून आपणाला उमेदवारी मिळणार, अशी अटकळ असणाऱ्या इच्छुकांना मात्र अशोकअण्णांच्या गुगलीने धडकी भरली आहे.आजरा साखर कारखान्याची पक्की मतदारयादी प्रसिद्ध झाली आहे. २२ एप्रिलपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. अद्याप आघाड्यांचे कोणतेच चित्र स्पष्ट नाही. वातावरणनिर्मितीत अशोकअण्णा चराटी यांनी आघाडी घेतली आहे. अशोकअण्णांची आक्रमक भूमिका पाहून अनेक मंडळींनी त्यांच्या आघाडीतून उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले आहेत.शिवसेना, स्वाभिमानी, रवींद्र आपटे यांचा गट अशोकअण्णांसोबत राहणार हेही स्पष्ट आहे. अशोकअण्णांच्या भूमिकेवर अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे.कोणत्याही परिस्थितीत अशोकअण्णा स्वतंत्र आघाडी उभारणारच असे गृहीत धरून इच्छुकांनी आपल्या जोडण्या लावण्यास सुरुवात केली आहे; पण अशोकअण्णांनीच ‘सावध’ चाचपणी सुरू करून उतावीळपणा न करता राजकीय मुत्सद्दीपणा दाखवत आपण कोणताही निर्णय घेऊ शकतो, असे सांगून ‘इच्छुकांनाही’ सावध केले आहे. केवळ साखर कारखाना निवडणूक एवढाच मुद्दा अजेंड्यावर ठेवून चालणार नाही, तर होऊ घातलेल्या नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांचाही विचार करून पावले टाकावी लागणार याची पूर्ण जाणीव असल्याने भडक विधान केले जाणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली आहे.अशोकअण्णा आणि जयवंतराव शिंपी एकत्र येणार अशी कार्यकर्त्यांची चर्चा असली, तरी जयवंतराव शिंपी यांनी याबाबत कुठेही उघड वाच्यता न करता भलेही राष्ट्रवादीच्या कामकाजावर टीका केली असली, तरी ते राष्ट्रवादीच्या प्रवाहात असल्याने ही केवळ चर्चाच ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जयवंतराव आणि अशोकअण्णा एकत्र येतीलच, असे ठामपणे म्हणणे चुकीचे आहे.इच्छुकांची धावपळतालुक्याच्या राजकीय पटलावर सगळेच गोंधळाचे वातावरण आहे. मुकुंददादा देसाई, उदय पवार, सुधीर देसाई यांनी अद्याप मौन बाळगले आहे. विष्णुपंतांनी आपण राष्ट्रवादीसोबतच राहणार असे जाहीर केले आहे. अंजनाताई रेडेकर यांनी आमदार सतेज पाटील घेतील त्या निर्णयास बांधील राहण्याचे ठरवल्याने इच्छुकांची मात्र चांगलीच धावपळ होऊ लागली आहे.सत्तारूढ एकत्र येऊ नयेत म्हणून प्रयत्नसत्तारूढ मंडळी एकत्र राहिल्यास विद्यमान संचालकांमधील अनेक पत्ते कट होणार आहेत, तर बहुतांशी इच्छुक राजकीयदृष्ट्या ‘निराधार’ होणार असल्याने अनेक कार्यकर्ते उलटसुलट विधाने करून सत्तारूढ एकत्र येऊ नयेत यासाठी प्रयत्नशील आहेत.