शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आशा कर्मचारी सोमवारी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 15:59 IST

कोल्हापूर : मानधन वाढीचा आदेश काढण्यास चालढकल करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा निषेध म्हणून येत्या सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस ...

ठळक मुद्देबिंदू चौकात आशांचे काळ्या फिती लावून निषेध आंदोलनआंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार

कोल्हापूर: मानधन वाढीचा आदेश काढण्यास चालढकल करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा निषेध म्हणून येत्या सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा निर्णय आशा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. शनिवारी आंदोलनाच्या तेराव्या दिवशी बिंदू चौकात आशांनी एकत्र जमून डोक्याला काळ्या फिती बांधून आंदोलन केले. एक हजारहून अधिक आशांनी यात सहभाग घेतला.शासनाकडे दिलेल्या प्रस्तावाप्रमाणे दुप्पट आणि तिप्पट मानधनाचा आदेश त्वरीत काढावा या मागणीसाठी जिल्ह्यातील आशा कर्मचाऱ्यांचे तीन सप्टेबरपासून आंदोलन सुरु आहे. कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या अध्यक्ष नेत्रदीपा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या या आंदोलनाचा शनिवारी तेरावा दिवस होता.

निषेध मोर्चे काढून, घोषणा देऊनही सरकार आवाज ऐकत नसल्याचा निषेध म्हणून आशांनी शनिवारी बिंदू चौकात शांततेचे प्रतीक असलेल्या पांढऱ्या साड्या परिधान करुन त्यावर काळ्या फिती बांधून शासनाचा निषेध नोंदवला.सकाळी चौकातील फुले, आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करुन सुरु झालेले आंदोलन दुपारी तीनपर्यंत चालले. आंदोलनस्थळी ऋतूराज पाटील यांनी भेट देऊन पाठींबा व्यक्त केला. चंद्रकांत यादव, भरमा कांबळे, शिवाजी मगदूम यांच्यासह नेत्रदीपा पाटील यांनी आंदोलकांसमोर मार्गदर्शन केले.

यावेळी येत्या सोमवारी १६ रोजी मुख्यमंत्री कोल्हापुरात महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने येत असल्याने त्यांच्याकडे भेटीची वेळ मागण्याचे ठरले. ती न दिल्यास सोमवारी सकाळपासूनच रेल्वे स्टेशनसमोर जमून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्री येईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवले जाणार आहे. ते आल्यावर रास्तो रोको करुन त्यांचा ताफा पुढे जाऊ द्यायचा नाही, असा निर्णय घेण्याचे ठरले.यावेळी उज्वला पाटील, संगीता पाटील, सुप्रिया गुदले, सारिका पाटील, ज्योती तावरे, वसुधा बोडके, मंदाकिनी कोडक, विमल अतिग्रे, सुरैय्या तेरदाळे, सुरेखा तिसंगीकर, सारिका जाधव, महादेवी कोळी, महादेवी पाटील, ज्योती पाटील, राधिका घाटगे, पुनम माळी, सरिता कांबळे यांच्यासह आशा, गटप्रवर्तकांनी सहभाग घेतला. 

 

टॅग्स :Morchaमोर्चाkolhapurकोल्हापूरWomenमहिला