शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आशा, गटप्रवतर्कांचा पंचायत समितीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:26 IST

गारगोटी : कोरोना महामारीच्या कालावधीत जिवावर उदार होऊन काम करणाऱ्या आशा, गटप्रवर्तकांना ग्रामपंचायतीने थकीत वाढीव मानधन त्वरित द्यावे, यासह ...

गारगोटी : कोरोना महामारीच्या कालावधीत जिवावर उदार होऊन काम करणाऱ्या आशा, गटप्रवर्तकांना ग्रामपंचायतीने थकीत वाढीव मानधन त्वरित द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तकांनी भुदरगड पंचायत समितीवर शुक्रवारी मोर्चा काढला. मागण्या त्वरित मान्य न केल्यास उपोषणाचा निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व सध्याचे संजयसिंह चव्हाण यांनी, ग्रामपंचायतींनी एप्रिल २०२० पासून एक हजार रुपयेप्रमाणे फरकासहित प्रोत्साहनपर भत्ता द्यावा, असा आदेश देऊनही याची अंमलबजावणी केलेली नाही. आशा, गटप्रवर्तकांचा थकीत भत्ता त्वरित द्यावा, अन्यथा १ ऑक्टोबरपासून उपोषण करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन सहायक गटविकास अधिकारी शिरीष भोकरे यांना देण्यात आले.

आंदोलनात जिल्हाध्यक्षा प्रतिभा इंदूलकर, कविता सुर्वे, नीता काशीद, कविता पाटील, रंजना लोहार, स्मिता देसाई, अनिता नलवडे, अनुराधा ढेरे, लता गोडसे, सुनयना देसाई, शीतल पाटील, शोभा कांबळे यांच्यासह तालुक्यातील सर्व आशा सेविका, गटप्रवर्तक उपस्थित होत्या.

फोटो ओळ

आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सहायक गटविकास अधिकारी एस. एस. भोकरे यांना आशा सेविकांनी दिले. यावेळी पी. ओ. पोवार, प्रतिभा इंदूलकर, कविता सुर्वे, नीता काशीद, कविता पाटील, रंजना लोहार आदी उपस्थित होते.

२४ गारगोटी आशा स्वयंसेविका