शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

‘साहित्य अकादमी’चे पान, कोल्हापूरच्या लेखकांनीच मिरवला सर्वाधिक मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 13:01 IST

कोल्हापूरच्या याच रांगड्या भाषेने मराठी साहित्य विश्वातही मोलाची भर घातली

कोल्हापूर : कोल्हापूर म्हटलं की दुधाची, कुस्तीची पंढरी... नद्यांचा सुपीक प्रदेश असलेल्या या तांबड्या मातीत रानाला इंगळी डसावी असे तर्रारून आलेले उसाचे फड हीच या मातीची सांगितली जाणारी ओळख. पण, कोल्हापूरच्या याच रांगड्या भाषेने मराठी साहित्य विश्वातही मोलाची भर घातली आहे. मराठी साहित्यातले तब्बल आठ मानाचे साहित्य अकादमी पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील साहित्यकांनी पटकाविले आहेत. राज्यात इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा ही संख्या सर्वाधिक आहे. वि. स. खांडेकर यांच्यापासून ते बुधवारी जाहीर झालेल्या कृष्णात खोत यांच्यापर्यंतचा साहित्य अकादमीचा हा प्रवास कोल्हापूर जिल्ह्यातील साहित्याला सुवर्णझळाळी देणारा ठरला आहे. विशेष म्हणजे एक अपवाद वगळता जिल्ह्यातील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकांना त्यांच्या कादंबरी याच साहित्यप्रकाराला हा पुरस्कार मिळाला आहे.साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकवर्ष - लेखकाचे नाव - साहित्यकृतीचे नाव१९६० - वि. स. खांडेकर - ययाती१९६४ - रणजित देसाई - स्वामी१९९० - आनंद यादव - झोंबी१९९२ - विश्वास पाटील - झाडाझडती२००१- राजन गवस - तणकट२००७ - गो. मा. पवार - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (चरित्र)२०२१- किरण गुरव - बाळूच्या अवस्थंतराची डायरी२०२३ - कृष्णात खोत - रिंगाण

शांतीनाथ देसाई यांनाही पुरस्कारशिवाजी विद्यापीठात कार्यरत असलेले शांतीनाथ देसाई यांच्या ‘ओम नमो ओम’ या कन्नड भाषेतील कादंबरीला २००० साली मरणोत्तर साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तर अर्धे आयुष्य कोल्हापुरात व्यतीत केलेल्या विजया राजाध्यक्ष यांना १९९३ साली ‘मर्ढेकरांची कविता’ या समीक्षाला साहित्य अकादमी मिळाला होता.

माणूस आणि पाळीव प्राणी यांच्यातील अंतरंग उलगडणारी मराठी साहित्यातील रिंगाण ही उत्तमातील उत्तम कादंबरी आहे. तिला पुरस्कार मिळणे अपेक्षित होतेच. कृष्णात खोत यांचे अभिनंदन. - राजन गवस, ज्येष्ठ लेखक. 

कृष्णात खोत यांनी धरणग्रस्तांचे नवे भावविश्व वेगळ्या पद्धतीने मांडले आहे. त्यांच्या कादंबरीला मिळालेला हा पुरस्कार कोल्हापूरच्या साहित्यक्षेत्राचा गौरव आहे. - प्रा. डॉ. रणधीर शिंदे, प्रसिद्ध समीक्षक.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsahitya akademi awardसाहित्य अकादमी पुरस्कार