शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल २४५८ मालमत्ता जमीनदोस्त, २०२१ च्या तुलनेत पाऊस कमी पण पडझड जास्त

By राजाराम लोंढे | Updated: July 31, 2024 18:29 IST

आतापर्यंत सरासरी ९५६ मिलीमीटर : शाहूवाडी, भुदरगडमध्ये मात्र यंदा अधिक पाऊस

राजाराम लोंढेकोल्हापूर : जुलै महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळल्याने महापुराचे संकट आले होते. आतापर्यंत सरासरी ९५६ मिलीमीटर पाऊस झाला असला तरी २०२१ च्या तुलनेत पाऊस कमीच आहे. हे जरी खरे असले तरी पडझड २४५८ मालमत्तांची झाली असून २०२१ पेक्षा तब्बल २७७ मालमत्ता अधिक आहेत. शाहूवाडी व भुदरगड तालुक्यात तुलनेत यंदा अधिक पाऊस झाला आहे.यंदा मान्सूनने वेळेवर हजेरी लावली असली तरी जून महिन्यात पाऊस कमी झाला. जुलैमध्ये पावसाने सुरुवात केली, मात्र पावसाने १० जुलैपासून खरी सुरुवात केली. त्यातही गेल्या आठ-दहा दिवसांत जिल्ह्यात धुवाधार पाऊस काेसळला. सगळीकडे पाणी पाणी झाले तर पंचगंगेने ४८ फुटाची पातळी गाठल्याने कोल्हापूरकरांना २०१९ व २०२१ च्या महापुराची आठवण होऊन चिंता वाढली होती. पावसाचा जोर वाढत जाईल, तशी धाकधूक वाढली होती.पण, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. जून महिन्यात सरासरी जेमतेम १९९ मिलीमीटर झाला होता. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात २६१ मिलीमीटर पाऊस झाला. मात्र, १५ जुलैनंतर जोरदार पाऊस कोसळल्याने या पंधरा दिवसात तब्बल ५०० मिलीमीटर पाऊस पडल्याने महापूर आला.पण, हा महापूर २०२१ च्या तुलनेत कमी होता. जुलै अखेर जिल्ह्याची सरासरी १०२६ मिलीमीटर आहे, त्यापैकी जुलै २०२१ पर्यंत ११२९ मिलीमीटर पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत ९५६ मिलीमीटर झाला आहे. जिल्ह्याचा पाऊस कमी असला तरी शाहूवाडी व भुदरगड तालुक्यात तुलनेत अधिक पाऊस झाला आहे.गेल्या पाच वर्षात जुलै अखेर अशी झाली पडझडवर्ष - मालमत्ता - नुकसान२०२० - १२५  -  ४५.९९ लाख२०२१ - २१८१ -  १०.३३ कोटी२०२२ - ३३९  -  १.०४ कोटी२०२३ - ३७०  - १.२० कोटी२०२४ - २४५८   -  ८.४२ कोटी

तुलनात्मक पाऊस, मिलीमीटरमध्ये असावर्ष         सरासरी पाऊस  जुलैपर्यंतची टक्केवारी२०२०         ३६५                 ५५२०२१         ११२९                ११६२०२२         ६४२                 ६२२०२३         ६८४                 ६६२०२४          ९५६                ९३

यंदा असा झाला पंधरवड्यात पाऊस, मिलीमीटरमध्येकालावधी  -  सरासरी पाऊस१ ते १५ जून - ८२.५१६ ते ३० जून - ११७.११ ते १५ जूलै - २६१.०१६ ते ३० जुलै - ५००.०

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर