शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘इंद्रधनुष्य’साठी कलाकारांचा संघ सज्ज

By admin | Updated: November 4, 2014 00:52 IST

शिवाजी विद्यापीठ : ४० जणांचा सहभाग; आज होणार अमरावतीला रवाना

कोल्हापूर : विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देणाऱ्या राज्यस्तरीय ‘इंद्रधनुष्य युवा महोत्सवा’साठी शिवाजी विद्यापीठाचा संघ उद्या, मंगळवारी रवाना होणार आहे. त्याच्या तयारीसाठी विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर भाषाभवनात आज, सोमवारी दिवसभर संघातील कलाकारांचा सराव रंगला होता.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बुधवार (दि. ५)पासून ‘इंद्रधनुष्य युवा महोत्सवा’ला सुरुवात होणार आहे. यामध्ये लोकनृत्य, सुगम गायन, समूहगीत, लोककला, लोककला वाद्यवृंद, अशा २४ कला प्रकारांमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या ४० कलाकारांचा संघ सहभागी होणार आहे. त्यांचा विद्यापीठात आठवडाभर सराव सुरू होता. आज दिवसभर कलाप्रकारनिहाय तालीम रंगली होती. त्यातून तयारीची चाचणीदेखील घेण्यात आली. या संघात अश्विनी वडगावे, कुणाल मसाले (केडब्ल्यूसी सांगली), गीता कुलकर्णी, ऋषिकेश देशमाने, रोहित पाटील, अरविंद कडोले, प्रितेश रणनवरे, पूर्वा कोडोलीकर, बाहुबली राजमाने, अशांत मोरे (विवेकानंद कॉलेज), मृणालिनी पाठक, चैतन्य देशपांडे, जयदेव भालेराव (डी.जे. कॉलेज सातारा), सोहम केळकर, मेधा मण्णूर, वरूण देशपांडे (विलिंग्डन कॉलेज सांगली), श्रेयस मोहिते, सलिम मुल्ला (शिवाजी विद्यापीठ), स्वराली लोटेकर (एलबीएस सातारा), दिगंबर साठे, निखिल साळुंखे (दे. आ. महाविद्यालय चिखली), प्रसाद लोहार, नीलेश गोलगिरे (यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, वारणानगर), नम्रता मोटे, प्रणिती शिंदे (पतंगराव कदम महाविद्यालय सांगली), मिताली पाटील (एएससी पलूस), अंकिता कांबळे (मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली), अमित शिंदे (किसनवीर महाविद्यालय, वाई), सुमित वाघ (नाईट कॉलेज, कोल्हापूर), किरण ढाणे, प्रियांका पाटील, भाग्यश्री कालेकर, सत्यजित साळुंखे, अमित माळकरी यांचा समावेश आहे. डॉ. श्रीकांत कोकरे, डॉ. संगीता पाटील या संघप्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. (प्रतिनिधी)