शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

सदर बझारमध्ये कृत्रिम पाणी टंचाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 14:08 IST

नवीन पाणी योजनेअंतर्गत सदर बझार येथील ग्रंथालयासमोर चार लाख लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. यातून या परिसराला मुबलक पाणीपुरवठा होत असला तरी काही विघ्नसंतोषींकडून या टाकीवरचा भाग  शौचालय म्हणून वापर केला जात असल्याने मैलामिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी या टाकीला जोडलेली घरातील नळ बंद केले आहे.

ठळक मुद्देटाकीचा वापर शौचालयसाठी नागरिकांनी पुरावा केला सादरजीवन प्राधिकरणच जवाबदार असल्याचा आरोप वारंवार मैलामिश्रित पाणीपुरवठा होत असल्याचा पुरावा

सातारा : नवीन पाणी योजनेअंतर्गत सदर बझार येथील ग्रंथालयासमोर चार लाख लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. यातून या परिसराला मुबलक पाणीपुरवठा होत असला तरी काही विघ्नसंतोषींकडून या टाकीवरचा भाग  शौचालय म्हणून वापर केला जात असल्याने मैलामिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी या टाकीला जोडलेली घरातील नळ बंद केले आहे. यामुळे या परिसरात कृत्रिम पाणी टंचाई होत निर्माण होत आहे. याला जीवन प्राधिकरणच जवाबदार असल्याचा आरोप नागरिकांमधून केला आहे.

समाजकंटकाकडून टाकीच्या भिंतीबरोबर टाकीत देखील लघुशंका केली जात आहे तर टाकीवरच चक्क शौचालय म्हणून वापर केला जात असून, टाकीमध्ये उतरून बाकीचा विधी केला जात असल्याचे काही नागरिकांच्या निर्दशनात आल्याने या टाकीतील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे सांगितले जात आहे. काही नागरिकांनी आपल्या घरातील नळाने टाकीतील येणारे पाणी भरले नसल्याने कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागला.

दरम्यान, गत सहा महिन्यांपूर्वीही असाच प्रकार घडला होता, त्यावेळी पालिका आरोग्य विभाग व जीवन प्राधिकरण कार्यालयातील अधिकाºयांनी पाहणी करून येथील स्वच्छता केली होती व टाकीही बाहेरून स्वच्छ करून टाकीजवळ बंदिस्त कुंपण घालण्याचे आश्वासन दिले होते; परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा तीच परिस्थिती येथे पाहायला मिळत आहे. यासाठी याला जबाबदार असणाºया अधिकाºयांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे भारत माता मंडळाचे कार्यकर्त्यांनी सांगितले. 

या परिसरात वारंवार मैलामिश्रित पाणीपुरवठा होत असल्याचा पुरावा देऊनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तर याच परिसरातील ‘स्वाईन फ्लूू’ने दोघांना जीव गमवावा लागला आहे. तरीदेखील याची  पालिका आरोग्य विभाग याचे दखल घेत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. टाकीवर दुर्गंधी पसरल्याने नाक मुठीतच धरून जावे लागत आहे. हेच पाणी नागरिकांना पिण्यासाठी पुरवठा केला जात आहे. यासाठी ही टाकी स्वच्छ धुऊन मगच पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. मैलामिश्रित पाण्याची टाकी...टाकीवरील मैला पावसाच्या पाण्याने या टाकीत जात  आहे. टाकीला झाकण नसल्याने टाकीतच लघुशंका केली जात असून, टाकीमध्ये दारूच्या बाटल्या, गुटखा पुड्या, सिगारेट तर टाकीच्या वर असलेल्या छोट्याशा छिद्रामधून गुटख्याच्या पिचकाºयाही पाहायला मिळत आहे. याचा पुरावाही येथील नागरिकांनी दिला आहे, तरी देखील मागील सहा महिन्यांपासून यावर उपाययोजना होत नाही. एकावं ते नवलच..

एकीकडे शासनाचा हगणदारीमुक्तीकडे वाटचाल असताना सदर बझारमध्ये  घडलेल्या या कृत्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. एकीकडे हणगदारीमुक्त उपक्रमाचे राज्यात सातारा जिल्ह्याचा गौरव होत असताना मात्र काही समाजकंटकाकडून उघड्यावर शौचालय करता येत नाही म्हणून चक्क ५० फूट उंच असलेल्या पाण्याच्या टाकीवर जाऊन शौचालय करून पाणी दूषित करण्याची मजल जात आहे. या कृत्याची चर्चा आज दिवसभर सदर बझारमध्ये रंगली होती.