शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

Maharashtra Election 2019 : छपन्न इंचवाल्या मोदींमुळेच ३७० कलम रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 05:46 IST

अमित शहा; कोल्हापुरात महायुतीच्या सभेत शरद पवार यांच्यावर टीकेचा भडिमार Maharashtra Election 2019 :

कोल्हापूर : विकासाची कामे काय होतील-राहतील; पण काश्मीरचे ३७० कलम रद्द करण्याची हिंमत ५६ इंच छातीवाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच दाखविली. हे कलम रद्द झाल्यानंतरची देशातील ही पहिलीच निवडणूक असल्याने महायुतीला विजयी करून हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून द्या, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी येथील विराट जाहीर सभेत केले. रखरखत्या उन्हातही सभा झाली.महापुरात कोल्हापूर-सांगलीचे प्रचंड नुकसान झाले. केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करून ही दोन्ही शहरे आम्ही सुंदर बनवू, असे आश्वासनही शहा यांनी दिले.

कोल्हापूर दक्षिणमधील भाजपचे उमेदवार आमदार अमल महाडिक व महायुतीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा झाली. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सभा असली तरी शहा यांनी ३७० कलम, तिहेरी तलाक, राष्ट्रवाद, सर्जिकल स्ट्राईक यांवरच जास्त काळ भूमिका मांडली. ‘जय भवानी... जय शिवाजी...’चा गजर करतच त्यांनी भाषणाला सुरुवात केली. येथील तपोवन मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

शहा म्हणाले, ‘मोदी-फडणवीस की राहुलबाबा-शरद पवार यांच्यापैकी तुम्हाला कुणाची निवड करायची आहे, हे ठरविणारी ही निवडणूक आहे. देशात आजपर्यंत एवढी सरकारे आणि इतके पंतप्रधान आले आणि गेले; परंतु त्यांच्यात काश्मीरचे ३७० कलम रद्द करण्याची हिंमत नव्हती. काश्मीरला भारताला जोडण्याची प्रक्रियाच काँग्रेसने रोखली होती.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, पुन्हा महायुतीचेच सरकार येणार हे स्पष्ट आहे. शरद पवार यांना पराभवाची छाया दिसू लागल्यामुळेच ते विचित्र हातवारे करू लागले आहेत. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला असे शोभत नाही. त्यांच्या पायांखालची वाळू घसरली आहे. पवार यांना नाही तर मग काय अशोक चव्हाण यांना टार्गेट करावे की काय?खुर्चीसाठी तारांबळराजकीय नेता असो की कार्यकर्ता; त्याला खुर्ची हवी असते. फरक इतकाच असतो की, कार्यकर्त्याला ती बसण्यासाठी आणि नेत्यांना सत्तेसाठी हवी असते. कोल्हापुरात रविवारी अमित शहा यांच्या सभेसाठी ऐनवेळी आणखी खुर्च्या मागवाव्या लागल्या.शिवसेनेकडे दुर्लक्षही सभा महायुतीची असल्याचे जाहीर केले असले तरी शिवसेनेचा एकही झेंडा नव्हता. शिवसेनेचे दोन्ही खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने व दोन आमदार या सभेकडे फिरकले नाहीत. व्यासपीठावरील फलकावर उद्धव ठाकरे यांचेही चित्र नव्हते. महायुतीतील रासप, रिपाइं, शिवसंग्राम, रयत क्रांती पक्षाचाही नेता सभेकडे फिरकला नाही.

टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019