गारगोटी : येथील युवा स्पोर्टस् गणेशोत्सव मंडळाच्या एकवीस फुटी लालबागचा राजा मूर्र्तीचे शुक्रवारी उत्साहात आगमन झाले. यावेळी मिरवणुकीसाठी पुणे येथील शिवगर्जना ढोल-ताशा पथकाला पाचारण करण्यात आले होते.आमदार प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या युवा स्पोर्टस् गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश चतुर्थीला अजून तीन दिवस अवधी असताना या मूर्तीच्या आगमनाने तालुक्यात उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. या राजाची मिरवणूक खानापूर येथून काढण्यात आली. या मिरवणुकीचा प्रारंभ उद्योजक नितीन पाटणे, शैलेंद्र पाथरवट यांच्या हस्ते, तर भाई आनंदराव आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. शिवगर्जना ढोल-ताशा पथकाने वाद्यांच्या आणि कवायतीच्या माध्यमातून उपस्थित भाविकांच्या मनाला भुरळ घातली. गारगोटीच्या सरपंच रूपाली राऊत, खानापूरच्या सरपंच प्रणिती नाईक, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रवीणसिंह सावंत, जिल्हा परिषद सदस्य प्राचार्य अर्जुन आबिटकर, बी. डी. भोपळे, अरुण शिंदे, राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्या विजयमाला चव्हाण, अशोक वारके, मानसिंग दबडे, आर. डी. पाटील, संग्राम सावंत उपस्थित होते.
गारगोटीत एकवीस फुटी बाप्पाचे आगमन
By admin | Updated: September 3, 2016 01:00 IST