शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2016 00:36 IST

राम शिंदे : आरेवाडीत दसरा मेळावा; राज्य सरकारकडून कायदेशीर बाबींची तपासणी

ढालगाव : धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कटिबध्द असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी शुक्रवारी दिले. धनगर समाजाचा पहिला दसरा मेळावा आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा बनात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. शिंदे बोलत होते. ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार प्रकाश शेंडगे, रमेश शेंडगे, मेळाव्याचे निमंत्रक गोपीचंद पडळकर प्रमुख उपस्थित होते. प्रा. शिंदे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने धनगर समाजाला दिलेला आरक्षणाचा शब्द सरकार नक्कीच पूर्ण करणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे. दसरा मेळाव्यानिमित्त येथे जमलेल्या या पिवळ्या वादळाची दखल सरकारला घ्यावी लागणार आहे. समाजाला चांगली दिशा मिळावी, यासाठी हे व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. आपल्याला मिळालेल्या पदाचा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी वापर करण्याबरोबरच, समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री बिरोबा तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या आराखड्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवून देऊ. आमदार देशमुख म्हणाले की, सत्तेवर आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर आरक्षण देण्याचा ठराव घेण्याचे आश्वासन भाजपने दिले होते, परंतु आजपर्यंत त्यावर कार्यवाही झालेली नाही. झोपेचे सोंग घेणाऱ्या राज्य शासनाला आजच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्यामुळे जाग येईल. प्रा. राम शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून द्यावी. महाराष्ट्रात ‘धनगर’ हीच जमात आहे, ‘धनगड’ नाही. शासनकर्ते अशा शब्दांचा आधार घेऊन धनगर समाजाला खेळवत आहेत. गोपीचंद पडळकर म्हणाले की, धनगर समाजाला विद्यमान सरकारकडून अनुसूचित जातीचे आरक्षण निश्चित मिळणार आहे. प्रस्थापितांनी फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेऊन धनगर समाजाला आरक्षण मिळू दिले नाही. धनगर समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा येतो, तेव्हा शरद पवार आदिवासी नेत्यांना भडकावतात. आम्हाला बारामतीच्या पवारांपेक्षा नागपूरचे देवेंद्र फडणवीस जवळचे आहेत. ते लवकरच मार्ग काढतील. आरेवाडीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे, बिरोबा देवस्थान विकासाचा आराखडा मंजूर करणे यासाठी पक्षभेद, गट-तट सोडून एकत्रित प्रयत्न करण्याची गरज पडळकर यांनी व्यक्त केली. प्रकाश शेंडगे म्हणाले की, धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार टाळाटाळ करीत आहे. यासंदर्भात सर्वेक्षणासाठी नेमलेल्या टाटा इन्स्टिट्यूटची प्रश्नावली म्हणजे समाजबांधवांची क्रूर चेष्टा आहे. श्री बिरोबा देवस्थानच्या कामासाठीचा साडेबारा कोटीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला असून त्याला मंजुरी देण्याची मागणी देवस्थान जीर्णोध्दार समितीचे कार्याध्यक्ष जयसिंग शेंडगे यांनी केली. यावेळी वीरशैव कक्कय्या समाजाचे सुरेश कांबळे, महादेव गडदे, चांदापूर कारखान्याचे अध्यक्ष उत्तम जानकर, सुरेश घागरे, बंडू डोंबाळे, मारूती सरगर आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी ठरलेल्या पल्लवी मेंढे, श्रीकांत पाटील, कृष्णात पिंगळे, डॉ. सतीश कोळेकर आदीसह विविध क्षेत्रात नाव मिळविलेल्या गुणवतांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्याहस्ते ध्वजारोहण करून मेळाव्याची सुरुवात झाली. यावेळी चंद्रकांत हाक्के, आकाराम मासाळ, दादासाहेब कोळेकर, मिलिंद कोरे, अनिल लोंढे, शशिकांत पवार, शशिकांत बजबळे, राजू पाटोळे, भोजलिंग बंडगर, जगन्नाथ कोळेकर, रावसाहेब कोळेक र, रामचंद्र पाटील, मनोज कोळेकर, गजेंद्र कोळेकर, राजाराम पाटील आदीसह हजारोंच्या संख्येने धनगर समाजबांधव उपस्थित होते. (वार्ताहर)नेत्यांऐवजी महापुरुषांच्या प्रतिमाश्री बिरोबा देवासमोर झालेल्या या मेळाव्यामधील प्रमुख व्यासपीठावर नेत्यांऐवजी थोर महापुरुषांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या, तर वक्त्यांसाठी उभारलेल्या दुसऱ्या व्यासपीठावर छत नसल्याने अनेक नेत्यांना उन्हातच उभे राहून बोलावे लागले. या दसरा मेळाव्यासाठी आलेल्या हजारो धनगर बांधवांनी सकाळी अकरापासून दुपारी तीनपर्यंत भर उन्हात उपस्थिती कायम ठेवली.मेळाव्यातील मागण्या आणि ठराव...धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे.गेल्या पंधरा वर्षात धनगर समाजाला मंत्रीपद मिळाले नव्हते. त्यामुळे मंत्रिमंडळात धनगर समाजाला स्थान दिल्याबद्दल भाजप सरकारचे अभिनंदन उरी हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली व सर्जिकल आॅपरेशन यशस्वी केल्याबद्दल भारतीय जवानांचे अभिनंदनअहमदनगर जिल्ह्याला ‘अहिल्यानगर’ नाव द्यासोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्याहा दसरा मेळावा पहिला असला तरी, यापुढे दरवर्षी दसऱ्याच्या सातव्या दिवशी मेळावा होणार : गोपीचंद पडळकरफडणवीस, पवारांवर टीकादसरा मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी, कॉँगे्रस व भाजपच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला. प्रमुख वक्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.