शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

लष्करप्रमुख रावत बुधवारी कोल्हापूरात, पोलीस, प्रशासनातर्फे रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 19:24 IST

भारतीय लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत हे  बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सैन्यदलाच्या टेंबलाई हिल येथे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत माजी सैनिकांचा मेळावा होणार आहे.

ठळक मुद्देलष्करप्रमुख रावत बुधवारी कोल्हापूरात, माजी सैनिकांचा मेळावापोलीस, प्रशासनातर्फे रंगीत तालीम

कोल्हापूर : भारतीय लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत हे  बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सैन्यदलाच्या टेंबलाई हिल येथे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत माजी सैनिकांचा मेळावा होणार आहे.सैन्यदलाच्या कोल्हापुरातील १०९ इन्फंट्री बटालियन (टीए) मराठा एलआयतर्फे बुधवारी टेंबलाई हिल येथील मिलिटरी स्टेशन येथे माजी सैनिकांचा मेळावा आयोजित केला आहे; त्यासाठी भारतीय लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत हे प्रमुख उपस्थित असणार आहेत.

या मेळाव्यात कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे चार हजार माजी सैनिक उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासाठी असणाऱ्या निवृत्तिवेतन, वैद्यकीय सुविधा, कर्ज उपलब्धता आदींबाबतची माहिती त्यांना तज्ज्ञांमार्फत दिली जाणार आहे. मिलिटरी स्टेशन येथे मंगळवारी मंडप उभारणी, साफसफाई, मेळाव्याचे नियोजन, आदी स्वरूपातील तयारी सुरू होती.

दरम्यान, लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत हे पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस, प्रशासन, अग्निशमन दल, बॉम्बशोध पथक आदींच्या उपस्थितीत एनसीसी भवन या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरण्याची रंगीत तालीम करण्यात आली. विमानतळावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.

हेलिकॉप्टरची चर्चादुपारी दोनच्या सुमारास एक हेलिकॉप्टर बराच वेळ शिवाजी विद्यापीठ, शासकीय तंत्रनिकेतन आदी परिसरात आकाशात घिरट्या घालत होते. ते पाहून राजारामपुरी परिसरातील लोकांच्या मनांत भिती निर्माण झाली. त्यांतील कांही लोकांनी पोलिस नियंत्रण कक्ष व ‘लोकमत’कडेही हेलिकॉफ्टर का फिरत असल्याची विचारणा केली. परंतू वस्तूस्थिती समजल्यावर त्यांची शंका दूर झाली.

 

 

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतkolhapurकोल्हापूर