कोल्हापूर : भारतीय सैन्यभरती प्रक्रियेमध्ये आज, बुधवारपासून विशेष बदल करण्यात येत असून, सैन्यभरती प्रक्रिया आता आॅनलाईन होणार आहे. या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला आॅनलाईन नावनोंदणी करणे सक्तीचे राहणार आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागाच्या सैन्यभरती कार्यालयाचे संचालक कर्नल राहुल वर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. वर्मा म्हणाले, भारतीय सैन्यभरती मेळाव्या ठिकाणी कोणताही उमेदवार थेट भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकत होता. यापुढे मात्र सैन्यभरतीत सहभागी होण्यासाठी आधी आॅनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर उमेदवाराला कायमस्वरूपी एक नोंदणी क्रमांक व पासवर्ड दिला जाईल. त्यावर त्याची माहिती कायमस्वरूपी राहील. या नोंदणीमार्फत त्या उमेदवारांची भरतीची वयोमर्यादा आहे तोपर्यंत त्याला भरती प्रक्रियेत सहभागी होता येईल. भरती मेळाव्यावेळी उमेदवाराने फक्त आपल्या नोंदणी क्रमांकावर भरती प्रक्रियेत सहभागी होत असल्याची पूर्वसूचना द्यावी लागणार आहे. या माहितीची प्रिंट काढून तो भरती मेळाव्यात सहभागी होऊ शकतो. उमेदवार भारतीय संरक्षण खात्याच्या वेबसाईटवर कोणत्याही ठिकाणाहून नोंदणी करू शकतो. ही नोंदणी पूर्णपणे मोफत आहे. याची अंमलबजावणी आज, १ जुलैपासून संपूर्ण भारतात होणार आहे, असे त्यांनी सांगितले.असे आहे संकेतस्थळ....६६६.्नङ्म्रल्ल्रल्ल्िरंल्लं१े८.ल्ल्रू.्रल्लपहिल्यांदा परीक्षा होण्याची शक्यतासैन्यभरतीमध्ये पुढील वर्षापासून प्रथम लेखी परीक्षा, त्यानंतर कागदपत्रे तपासणी, शारीरिक पात्रता, वैद्यकीय तपासणी घेण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असेही वर्मा यांनी सांगितले.
सैन्यभरती आता आॅनलाईन : वर्मा
By admin | Updated: July 1, 2015 00:57 IST