शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

मंजूर.. मंजूर.. हद्दवाढ मंजूर...

By admin | Updated: June 24, 2014 01:18 IST

महापालिकेची विशेष सभा : एकमताने ठराव; प्रस्ताव मुंबईकडे; आता चेंडू शासनाच्या कोर्टात

कोल्हापूर : गेली चाळीस वर्षे रखडलेल्या कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या प्रस्तावास महापालिका सभागृहाने आज, सोमवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी दिली. त्यामुळे शहराची हद्दवाढ होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे पडले. मंजुरीनंतर महापालिकेचा प्रस्ताव आता राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. राज्य शासन त्यावर हरकती व सूचना मागविणार असून त्यानंतर ३१ जुलैपर्यंत या विषयाचा काहीतरी निर्णय अपेक्षित आहे.मुंबई उच्च न्यायालयाने ३१ जुलैपर्यंत राज्य शासनाने कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत ठोस निर्णय घ्यावा, असे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने नव्या गावांतील करप्रणाली, पायाभूत सुविधा, महसूल देणी, आदींबाबत महापालिकेकडून अभिप्राय मागविला आहे. नगरविकास संचालकांनी यापूर्वीच हद्दवाढीस हिरवा कंदिल दाखविला आहे. नगरविकास संचालक व जिल्हाधिकारी यांच्या अभिप्रायावर चर्चा करून हद्दवाढीस मंजुरी देण्यासाठी महापौर सुनीता राऊत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. विकास निधी व शहराचा फायदा याबाबत अनेक नगरसेवकांनी शंका उपस्थित करीतच हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर केला. ‘शहराची हद्दवाढ झाल्यानंतर महापालिका व ‘त्या’ गावांसाठी नेमका काय फायदा होणार, याची पडताळणी करा’, ‘निव्वळ भावनेच्या भरात हद्दवाढ नको’, ‘उपनगरांत सुविधा देताना प्रशासनाच्या तोंडाला फेस येत आहे. दोन लाखांचा विकास निधी मिळविताना नगरसेवकांची दमछाक होते’, ‘नव्या गावांसह शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करूया’, अशा प्रतिक्रियाही नगरसेवकांनी सभागृहात व्यक्त केल्या. यावेळी झालेल्या चर्चेत शारंगधर देशमुख, प्रकाश नाईकनवरे, संभाजी जाधव, आर. डी. पाटील, भूपाल शेटे, दीपाली ढोणुक्षे, लीला धुमाळ, आदींनी सहभाग घेतला.भावनिक होऊ नकाजयंत पाटील यांनी, जीवन प्राधिकरणकडून नळपाणी योजना घेताना भावनिक होऊन सभागृहाने निर्णय घेतला. हद्दवाढ हा मोठा विषय आहे. शासनाकडून मिळणारा निधी व महापालिकेची आर्थिक कु वत पाहूनच याबाबत निर्णय घ्यावा. प्रस्तावित गावांतील भावना तीव्र आहेत. या गावांना महापालिका पुरवित असलेल्या सुविधांची माहिती द्यावी. निधी मिळविताना दमछाकदोन लाखांचा निधी मिळाला तरी राष्ट्रपती पदक मिळाल्याचा आनंद नगरसेवक यांना होतो. टोल, एलबीटी लादताना महापालिकेचे मत विचारात घेतले होते का? आता ही एक थेट अधिसूचना काढून शासनाने हद्दवाढ करावी. शेजारील गावांसोबत आमची भांडणे लावण्याचा उद्योग नको.