शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महापालिकेचा कारभार संथ, नोकर भरतीस मंजूरी द्या; आमदार जयश्री जाधव यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी 

By विश्वास पाटील | Updated: October 3, 2023 16:42 IST

नागरिकांची मोठी गैरसोय

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेतील कामकाज संथ सुरु असून नोकर भरतीच्या आकृतीबंधास तातडीने मंजूरी द्यावी अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.महापालिका प्रशासनाने सुमारे 5 हजार 44 इतक्या पदांचा नवीन आकृतीबंध  नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या आकृतीबंधात माहूर, गाडीवान, लेबर यांच्यासह इतर कालबाह्य 465 पदे रद्द करण्यात आली आहेत. मोठ्या प्रमाणात शिपाई पदे रद्द केली आहेत. नव्याने 400 पदांची निर्मिती केली आहे. यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर, सिस्टीम मॅनेजर, वैद्यकीय अधिकारी यांच्यासह इतर पदांचा समावेश आहे. या आकृतीबंधाला नगरविकास विभागाने मंजुरी दिली नसल्याने महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासकीय कारभार संथ गतीने सुरू असून, नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.या आकृतीबंधास मंजुरी देण्यात यावी अशी मागणी अधिवेशनात लक्षविधीद्वारे केली होती. या लक्षवेधी प्रश्नास नगर विकास विभागाने उत्तर दिले असून, यामध्ये महानगरपालिकेने सादर केलेल्या  आकृतीबंधाची तपासणी करण्यात येत आहे. सन 2023 करता केवळ एक वेळची बाब म्हणून आस्थापना खर्चाच्या 35 टक्के मर्यादाची अट शिथिल करून अत्यावश्यक अत्यंत गरजेचे पदे भरण्याचे निर्देश महापालिकेस देण्यात आल्याचे नमूद केले आहे. मात्र,  यामधून महानगरपालिकेचा प्रशासकीय कारभार गतिमान होणार नाही.नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तसेच कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आकृतीबंधाला मंजुरी देणे गरजेचे आहे. त्यामुळे नगर विकास विभागाने कोल्हापूर महानगरपालिकेतील नोकर भरतीच्या आकृतीबंधास त्वरित मंजुरी द्यावी असे आमदार जाधव यांनी म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर