शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

युनिफाईड बायलॉज'च्या मसुद्याला मंजुरी देणार -एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 18:33 IST

Muncipal Corporation, Eknath Shinde, Sanjay Mandalik , kolhapur मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील अन्य सर्व महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या व रखडलेल्या नव्या बांधकाम प्रकल्पांना उभारी मिळण्यासाठी नगरविकास खात्याकडून 'युनिफाईड बायलॉज च्या मसुद्याला तात्काळ मंजुरी देण्याची ग्वाही' नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक व क्रिडाईच्या शिष्टमंडळाला दिली.

ठळक मुद्देनगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची खासदार मंडलिक यांना  ग्वाहीमहानगरपालिकांच्या हद्दीतील रखडलेल्या नव्या बांधकाम प्रकल्पांना मिळणार गती

मुंबईमुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील अन्य सर्व महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या व रखडलेल्या नव्या बांधकाम प्रकल्पांना उभारी मिळण्यासाठी नगरविकास खात्याकडून 'युनिफाईड बायलॉज च्या मसुद्याला तात्काळ मंजुरी देण्याची ग्वाही' नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक व क्रिडाईच्या शिष्टमंडळाला दिली.खासदार मंडलिक यांनी क्रीडाईच्या पदाधिकाऱ्यांसोबत सहा महिने रखडलेल्या युनिफाईड बायलॉजच्या मंजूरीसाठी ठाणे येथे मंत्री शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. यावेळी झालेल्या बैठकीतील चर्चेत या प्रश्नी तातडीने निर्णय घेणार असल्याची ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी दिली.हा निर्णयामुळे कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत आलेल्या बांधकाम व्यवसायाला पुनरुज्जीवन मिळेलच, त्याचबरोबर रोजगाराच्या संधी सह राज्य आणि शहरांच्या महसुलातही वाढ होईल. असे खासदार मंडलिक सांगितले.मंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात खासदार मंडलिक यांनी म्हटले आहे की," राज्य शासनाने मुंबई वगळून संपुर्ण महाराष्ट्रामधील महानगरपालीका, नगरपरिषद, प्राधिकरण व रिजनल प्लॅन या सर्वांसाठी एकच बांधकाम नियमावली करण्याचे ठरवून युनिफाईड बायलॉज च्या नियमावलीचा अंतिम मसुदा तयार केला आहे. मात्र तो सहा महिने प्रलंबीत असल्याने शहरांचा विकास व महसूल थांबलेला आहे. त्यामुळे बांधकाम विभागासह सामान्य नागरिकांनाही अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे. 

हा बायलॉज तातडीने लागू झाल्यास बांधकाम व्यवसायामध्ये सुसूत्रता येणार असून त्यामुळे राज्याच्या आणि शहराच्या विकासाची दारे खुली होणार आहेत. तसेच यात नागरिकांचाही मोठा फायदा होणार आहे. राज्यातील कोल्हापूर सह अन्य १५ 'ड' वर्ग महानगरपालिका यामुळे फायदा होणार आहे."नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेत खासदार संजय मंडलिक यांच्यासह, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महाराष्ट्र क्रीडाईचे अध्यक्ष राजीव पारेख, कोल्हापूर क्रीडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, देवरापुरकर ,रवीकिशोर माने, नितिन पाटील, अजय कोराणे, अ‍ॅड. सुरेश कुर्‍हाडे, चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक विज्ञान मुंडे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाEknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Mandalikसंजय मंडलिकkolhapurकोल्हापूरMumbaiमुंबई