शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

रस्ते हस्तांतरणाचा ठराव मंजूर

By admin | Updated: June 21, 2017 01:12 IST

महापालिका सभेत अभूतपूर्व गोंधळ : अंगावर धावून जाण्याचे प्रकार; राजदंड पळविण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शहरातील प्रमुख पाच रस्त्यांवरील बंद झालेल्या मद्यविक्रीस प्रत्यक्ष प्रोत्साहन देणारा रस्ते हस्तांतरणाचा ठराव मंजूर करण्यावरून महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी अभूतपूर्व गोंधळ झाला. सत्तारूढ आणि विरोधक एकमेकांच्या समोर उभे ठाकल्याने तब्बल पाच तास शाहू सभागृह जणू कुस्तीचा आखाडाच बनले. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यासह धक्काबुक्की, जोरदार घोषणाबाजी आणि राजदंड पळविण्याच्या प्रयत्नामुळे सभागृहाच्या कामकाजाचा लांच्छनास्पद इतिहास लिहिला गेला. अखेर रस्ते हस्तांतरणाचा वादग्रस्त ठराव सत्तारूढ कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने बहुमताने जिंकला. त्यामुळे या रस्त्यांवरील मद्यविक्रीचा मार्ग मोकळा झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शहरातून जाणारे चार राज्यमार्ग व एका राष्ट्रीय महामार्गावरील मद्यविक्रीची ८९ दुकाने बंद झाली आहेत. ती चालू करता यावीत म्हणून महापालिकेतील सत्तारूढ कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीतर्फे हे पाच रस्ते ताब्यात घेण्याचा ठराव मांडला होता. त्यास भाजप-ताराराणी आघाडीने तीव्र विरोध केला. सभागृहात झालेला हा विरोध मोडून काढत सत्तारूढ आघाडी सदस्यांनी बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर करून घेतलाच; शिवाय ते टीकेचे धनीही बनले. ठरावाला विरोध करताना सभागृहात जोरदार घोषणाबाजी झाली. ‘दारूबंदी झालीच पाहिजे,’ अशा घोषणांनी सभागृह दुमदुमले. त्याच वेळी सत्तारूढ सदस्यांनीही ‘रस्ते हस्तांतर झालेच पाहिजे’ अशा घोषणा देत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. या घोषणाबाजीवेळी सत्तारूढ सदस्य प्रतापसिंह जाधव यांनी विरोधी गटाच्या कमलाकर भोपळे यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे गोंधळात आणखी भर पडली. कोण काय बोलतोय हे कळत नव्हते एवढी आरडाओरड सुरू होती. शेवटी महापौर हसिना फरास यांनी अर्ध्या तासाकरिता सभागृह तहकूब केले. एक तासानंतर पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरू झाले; परंतु दोन्ही बाजूंची आक्रमकता कायम होती. विरोधी गटाचे सदस्य सभाध्यक्ष महापौर फरास यांच्यावर ठराव नामंजूर करण्यासाठी दबाव टाकत राहिले. त्याचवेळी सत्तारूढ सदस्य तितक्याच ताकदीने आपली बाजू पुढे दामटत राहिले. त्यामुळे ईर्षेने पेटून उठलेल्या दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी महापौरांच्या आसनाकडे धाव घेतली. त्याच वेळी विलास वास्कर यांनी राजदंडाला हात घातला आणि तो हिसकावून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. किरण नकाते व संतोष गायकवाड यांनीही राजदंड खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पुन्हा अभूतपूर्व गोंधळ उडाला. महापौरांनी सर्वांना सक्त ताकीद देऊन शांत केले आणि ठरावावर मतदान घेतले.