शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

‘गडहिंग्लज’च्या विकास आराखड्यास मंजुरी

By admin | Updated: May 19, 2015 00:22 IST

अध्यादेश लवकरच : नगराध्यक्षा घुगरे यांची माहिती

गडहिंग्लज : तब्बल पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गडहिंग्लज शहराच्या दुसऱ्या सुधारित विकास आराखड्यास नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी मंजुरी दिली. आराखडा मंजुरीचा अध्यादेश लवकरच शासनाकडून काढला जाईल, अशी माहिती नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांनी दिली.१५ मे २०१० रोजी तत्कालीन सत्ताधारी जनता दल-जनसुराज्य आघाडीने हा आराखडा तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला होता. त्यास भागश: मंजुरी मिळाली होती. आराखड्यातून वगळलेल्या भागाच्या मंजुरीसंदर्भात राज्यमंत्री डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे मंत्रालयात सोमवारी ही बैठक झाली. आराखड्यास दोनवेळा मुदतवाढ मिळाली होती. १ जून २०१५ पूर्वी अंतिम मंजुरी मिळणे अपेक्षित होते. त्यानुसार या आराखड्यास अंतिम मंजुरी मिळाली. नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, मुख्याधिकारी तानाजी नरळे, नगरअभियंता रमेश पाटील यांनी विकास आराखड्यासंदर्भात राज्यमंत्र्यांना माहिती दिली. यावेळी बाळासाहेब घुगरे, राहुल पाटील, युवराज बरगे उपस्थित होते.बैठकीस नगरविकास खात्याचे सहसचिव अविनाश पाटील, नगररचना सहसंचालक भुक्ते, सहायक संचालक चव्हाण, नगररचनाकार पवार, आदींसह नगरविकास खात्याचे अधिकारी उपस्थित होते. शहराच्या विकास आराखड्यास अंतिम मंजुरी मिळाल्याने शहरवासीयांतून आनंद व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)विकास आराखड्याची वाटचाल२२ जुलै १९८३ : गडहिंग्लजची पहिली सुधारित विकास योजना मंजूर.१ नोव्हेंबर २००१ : दुसऱ्या विकास आराखड्याची इरादा सूचना जाहीर.२९ मे २००७ : नागरिकांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या.२ जानेवारी २००८ : आराखड्यासाठी चार सदस्यीय समितीची नेमणूक.५ डिसेंबर २००८ : पालिकेच्या सर्वसाधारण सभेत समितीचा अहवाल मंजूर.४ एप्रिल २०१२ : आराखड्यास भागश: मंजुरी आणि वगळलेल्या भागांबाबत संबंधितांच्या हरकती व सूचना मागविल्या.२१ आॅगस्ट २०१२ : प्राप्त हरकती व सूचनांबाबत सुनावणी. ५ सप्टेंबर २०१२ : नगररचना उपसंचालकांकडून समक्ष जागा पाहणी व प्राप्त १४ हरकती आणि नगररचना उपसंचालकांचा अहवाल शासनास सादर. त्यानंतर नगरविकास प्रधान सचिवांसमोर सुनावणी. आॅगस्ट २०१४ : तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्याकडून आराखड्यास हिरवा कंदील.१८ मे २०१५ : शहर विकास आराखड्यास नगरविकास राज्यमंत्र्यांची अंतिम मंजुरी.