शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
3
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
4
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
5
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
8
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
9
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
10
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
13
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
16
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
17
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
18
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
19
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
20
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?

शिव-शाहूंच्या वंशजांची नियुक्ती हे देशाचे भाग्य

By admin | Updated: June 14, 2016 00:52 IST

नरेंद्र मोदी : संभाजीराजे यांचा अलाहाबाद येथील भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत सत्कार

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती यांची राष्ट्रपती-नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती झाल्याबद्दल सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. शिव-शाहू यांच्या वंशज असलेल्या संभाजीराजे यांची नियुक्ती ही आमच्यासह संपूर्ण देशासाठी भाग्याची बाब आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे काढले.अलाहाबाद (उत्तरप्रदेश) येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. यावेळी ते बोलत होते.यावेळी संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख उपस्थिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, माजी उपपंतप्रधान व ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह १६ राज्यांचे मुख्यमंत्री यांची होती. या सत्कार सोहळ्यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी जागेवर उभे राहून टाळ्यांच्या गजरात संभाजीराजेंचे अभिनंदन केले.राष्ट्रपती कोट्यातून संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेवर थेट निवड झाल्यानंतर सोमवारी सकाळी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील खास विमानाने संभाजीराजेंना घेऊन अलाहाबाद येथे गेले. येथे संभाजीराजे यांचा अभूतपूर्व सत्कार करण्यात आला.नरेंद्र मोदी म्हणाले, शिव-शाहू यांचे वंशज असलेल्या संभाजीराजे यांची नियुक्ती ही आमच्यासह संपूर्ण देशासाठी भाग्याची बाब आहे.दरम्यान, सत्कारापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उपस्थित देशभरातील मान्यवरांना छत्रपती शिवराय व लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या देदीप्यमान इतिहासाची माहिती दिली. बहुजन समाजाचा उद्धार करणाऱ्या शाहू महाराजांनी १९०२ साली दिलेले आरक्षण, सक्तीच्या शिक्षणाचा केलेला कायदा, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उच्च शिक्षणासाठी केलेली आर्थिक तरतूद यांची माहिती दिली. (प्रतिनिधी)सर्वांनी उभे राहून सन्मान करुया : शहाछत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांचा सन्मान म्हणजे छत्रपती घराण्याचा सन्मान आहे. त्यांना राज्यसभेवर सदस्यपद देऊन संभाजीराजेंचा सन्मान करू शकलो हे आमचे भाग्य आहे. त्यामुळे सत्कारावेळी सर्वांनी उभे राहून त्यांचा सन्मान करूया, असे अमित शहा यांनी यावेळी सांगितले.