कला, वाणिज्य, विज्ञान, शिक्षणशास्त्रातील सर्व पदविका, प्रमाणपत्र आणि पदवी अभ्यासक्रम, बी. व्होक., अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, टेक्सटाईल, बी. टेक., विधी, एमबीए, आदी विविध अभ्यासक्रमांच्या ७३८ परीक्षा होणार आहेत. त्यांचे स्वरूप ऑनलाईन एमसीक्यू असणार आहे. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना सोमवार (दि.५) ते १४ जुलै दरम्यान विनाविलंब शुल्कामध्ये, विलंब शुल्कासह दि. १६ ते १९ जुलैपर्यंत, तर अतिविलंब शुल्कासह दि. २३ ते २६ जुलै या कालावधीत अर्ज करता येणार आहेत. याबाबतची अधिक माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या परीक्षांचे वेळापत्रक तयार करण्याचे काम सुरू असून लवकर ते जाहीर करण्यात येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी गुरुवारी दिली.
विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांसाठी सोमवारपासून अर्ज करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:17 IST