शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

राष्ट्रवादीच्या दुर्वास कदम यांचा अर्ज अवैध

By admin | Updated: September 30, 2014 01:06 IST

१५ जणांचे अर्ज वैध : पक्षाच्या नावातील चुकीचा फटका बसला

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तीन अर्ज आज, सोमवारी झालेल्या छाननीत अवैध ठरले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीच्या दुर्वास परशराम कदम, अपक्ष सर्जेराव अण्णा पाटील आणि भाजपच्या शोमिका अमल महाडिक यांचा समावेश आहे. करवीर तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांच्यासमोर छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली. ‘दक्षिण’ मतदारसंघासाठी दुर्वास कदम यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, अर्जात त्यांनी पक्षाचे अधिकृत असलेल्या ‘नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी’ या नावाऐवजी ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ असा उल्लेख केल्याने त्यांचा अर्ज बाद झाला. तसेच पाचगावमधील सर्जेराव पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला होता. यात त्यांनी अर्जातील ‘क’ हा रकाना निरंक ठेवला होता. तसेच त्यांनी स्वाक्षरी केली नव्हती. त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. भाजपकडून शोमिका महाडिक यांना पक्षाने ए.बी. फॉर्म दिला नसल्याने त्यांचा अर्ज छाननीत बाद ठरला. ‘कोल्हापूर दक्षिण’साठी एकूण १८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तीन अवैध ठरल्याने आता १५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये माजी मंत्री सतेज पाटील (इंडियन नॅशनल काँग्रेस), अमल महाडिक (भारतीय जनता पार्टी), नूरमहंमद सरखवास (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), विजय देवणे (शिवसेना), राजू दिंडोर्ले (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), रवींद्र कांबळे (बहुजन समाज पार्टी), आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)