प्रवीण देसाई - कोल्हापूर -पारदर्शकपणा येण्यासाठी ‘महावितरण’ने ‘आॅनलाईन’ पद्धतीने नवीन वीजजोडणीचे सूत्र अवलंबिले आहे. सुमारे बावीस महिन्यांपासून सुरू असलेल्या या सुविधेत सहभागी होण्यासाठीचा अर्ज मराठीत उपलब्ध नसल्याने इच्छा असूनही ग्राहकांची गोची होत आहे. एकीकडे ‘महावितरण’ने केलेली सक्ती व दुसरीकडे फक्त इंग्रजीतच अर्ज यामुळे ग्राहकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.‘महावितरण’ने फेब्रुवारी २०१३ पासून आॅनलाईन पद्धतीने विजेची नवीन जोडणी (कनेक्शन) सक्तीची केली आहे. आतापर्यंत या सुविधेत ७३ हजार ६२ इतके ग्राहक ‘महावितरण’शी जोडले गेले आहेत. त्यामध्ये घरगुतीसह शेती व व्यावसायिक कनेक्शनचा समावेश आहे.आॅनलाईन कनेक्शनसाठी फक्त इंग्रजीतच अर्जाची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या नेटसह अन्य सोशल मीडियावरही मराठीचा वापर होत आहे. असे असताना सहजसोप्यारितीने समजणाऱ्या आपल्या मातृभाषेतील मराठीत अर्जाची सोय ‘महावितरण’ने केलेली नाही. याबाबत उलट-सुलट प्रतिक्रिया ग्राहकांतून उमटत आहेत.सद्य:स्थितीला अर्ज केल्यानंतर सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे मिळणारी संगणकीकृत पोहोचपावती व त्यावरील विशेष सांकेतांक (युनिक कोड) घेणे गरजेचे आहे तसेच ‘महावितरण’ने जाहीर केलेल्या नवीन वीजजोडणी दराव्यतिरिक्त कोणतीही रक्कम ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यास अथवा इतर कोणास देऊ नये, असे ‘महावितरण’तर्फे यापूर्वीच निवेदनाद्वारे जाहीर केले आहे.अनावश्यक वेळ लावल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाईनवीन जोडणीसाठी संगणकाद्वारे अर्ज भरण्याबाबत माहिती मिळण्यासाठी ‘महावितरण’च्या ६६६.ेंँं्िर२ूङ्मे.ूङ्मे या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे. आॅनलाईन अर्ज भरल्यानंतर सदर ग्राहकास प्रत्यक्ष वीज जोडणी मिळेपर्यंतचा प्रवास संगणकीकृत केला असल्याने अर्जाच्या प्रत्येक टप्प्यावरील प्रगती ही संबंधित ग्राहक व अधिकाऱ्यांना तपासण्याची सोय आहे. सदर प्रक्रियेत अनावश्यक वेळ झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईसुद्धा होऊ शकते. आॅनलाईन कनेक्शनची पद्धत सुरुवातीला आॅनलाईनद्वारे ए-वन अर्र्ज भरणे. हा अर्ज भरल्यानंतर ‘महावितरण’चे कर्मचारी जाऊन सर्व्हे करतात. (हा सर्व्हे शहरी भागासाठी ७ दिवस, तर ग्रामीण भागासाठी १० दिवसांत केला जातो.) त्यानंतर संबंधित अर्जदाराला एस्टिमेट दिले जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेवटी वीजमीटर देऊन त्यांना ‘महावितरण’चे ग्राहक केले जाते.आॅनलाईन कनेक्शनद्वारेच ग्राहकांना वीज कनेक्शन दिली जात आहेत. ‘महावितरण’च्या प्रत्येक कार्यालयात यासाठी स्वतंत्र संगणक व कर्मचाऱ्याची सोय करण्यात आली आहे. त्याशिवाय ग्राहक स्वत:ही आॅनलाईनद्वारे अर्ज भरू शकतात. शक्यतो त्यांनी स्वत: भरावा.- फुलसिंग राठोड, जनसंपर्क अधिकारी, महावितरण
‘महावितरण’चा अर्ज मराठीत नसल्याने गोची
By admin | Updated: December 10, 2014 23:47 IST