शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

लघुपट, मायमराठी स्पर्धेसाठी प्रवेशिका भरण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 11:55 IST

आठव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत होणाऱ्या लघुपट व माय मराठी स्पर्धेसाठी प्रवेशिका भरण्यासाठी संयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देलघुपट, मायमराठी स्पर्धेसाठी प्रवेशिका भरण्याचे आवाहनअंतिम तारीख १५ डिसेंबर, संकेतस्थळावर प्रवेशपत्रे उपलब्ध

कोल्हापूर : आठव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत होणाऱ्या लघुपट व माय मराठी स्पर्धेसाठी प्रवेशिका भरण्यासाठी संयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.यंदाच्या ‘किफ्फ’मध्ये जागतिक, भारतीय तसेच नवीन मराठी चित्रपट, लघुपट, दिग्दर्शक मागोवा, लक्षवेधी देश अशा विविध विभागांत चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. याअंतर्गत लघुपट स्पर्धा होत असून, त्यात ३० मिनिटे कालावधीतील लघुपटांना प्रवेश दिला जाईल. तसेच निवड झालेले लघुपट महोत्सवात दाखविले जातील. त्याचप्रमाणे २०१९ मध्ये सेन्सॉर झालेल्या नवीन मराठी चित्रपटांची स्पर्धा घेतली जाणार असून, निवड झालेले सात चित्रपट महोत्सवात दाखविले जातील.

त्यातून उत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, पटकथा हे पुरस्कार दिले जाणार आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रेक्षकांच्या मतांवर प्रेक्षक पुरस्कारही दिला जातो. या दोन्ही स्पर्धांसाठी प्रवेशिका भरण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर असून संकेतस्थळावर प्रवेशपत्रे उपलब्ध आहेत. तरी इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक दिलीप बापट यांनी केले आहे. 

 

टॅग्स :Short Filmsशॉर्ट फिल्मkolhapurकोल्हापूर