कोल्हापूर : मास्कची विक्री शासनाने निश्चित केलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीने कोणत्याही घाऊक अथवा किरकोळ औषध विक्रेते यांच्यामार्फत होत असल्यास त्याबाबतची तक्रार सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त स. घु. घुणकीकर यांनी केले आहे. लोकमतने चढ्या दराने मास्क विक्री होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.कोल्हापूर येथील अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या ०२३१/२६४१०९१ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा fdakolhapurdrug@gmail.com या ई-मेलवर करावी तक्रार करावी, असेही याबाबतच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.कोविड-१९ साथरोगापूर्वी व साथरोगानंतर मास्क (२ प्लाय, ३ प्लाय व एन ९५) यांच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाने २० ऑक्टोबर २०२० च्या शासननिर्णयानुसार सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात मास्क उपलब्ध करून देण्यासाठी मास्कची दर्जानुसार अधिकतम विक्रीमूल्य निश्चित केले आहे. त्यानुसार सर्व घाऊक व किरकोळ विक्रेत्यांनी त्यांच्या आस्थापनेच्या दर्शनीभागात शासनाने निश्चित केलेल्या मास्क दराचे फलक लावणे व मास्कची विक्री त्याच दराने करणे आवश्यक आहे.
जादा दराच्या मास्क विक्रीबाबत तक्रार करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 17:33 IST
CoronaVirus, mask, collectoroffice, kolhapur मास्कची विक्री शासनाने निश्चित केलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीने कोणत्याही घाऊक अथवा किरकोळ औषध विक्रेते यांच्यामार्फत होत असल्यास त्याबाबतची तक्रार सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त स. घु. घुणकीकर यांनी केले आहे. लोकमतने चढ्या दराने मास्क विक्री होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.
जादा दराच्या मास्क विक्रीबाबत तक्रार करण्याचे आवाहन
ठळक मुद्देजादा दराच्या मास्क विक्रीबाबत तक्रार करण्याचे आवाहनलोकमतमधील बातमीची दखल