शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

फुटबाॅलचे महागुरू आप्पासाहेब वणिरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:23 IST

शिवाजी पेठेचा मानबिंदू व राजर्षी शाहूकालीन प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या ते संचालकपदी कार्यरत होते. त्यांनी संस्थेच्या सचिव पदाची ...

शिवाजी पेठेचा मानबिंदू व राजर्षी शाहूकालीन प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या ते संचालकपदी कार्यरत होते. त्यांनी संस्थेच्या सचिव पदाची जबाबदारी काहीकाळ सांभाळली होती. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळख होती. ते १९९२ मध्ये सेवानिवृत्त झाले होते; पण त्यांची शेवटपर्यंत संस्थेशी असलेली नाळ कायम होती. वणिरे यांचा जन्म हा १२ डिसेंबर १९३४ मधील. एमएबीड पर्यंत शिक्षण घेतलेल्या वणिरे यांनी अध्यापनाबरोबरच खेळाकडेही विशेष लक्ष होते. वणिरे संस्थेचे माजी चेअरमन डी. बी. पाटील यांचे ते विश्वासू सहकारी होते. माजी मुख्याध्यापक आर. डी. आतकिरे, आप्पासाहेब वणिरे व मधुकर सरनाईक यांची घनिष्ट मैत्री होती. माजी मुख्याध्यापक आतकिरे व वणिरे हे दोघे उत्तम फुटबॉल प्रशिक्षक होते. कोल्हापुरातील अनेक फुटबॉल खेळाडूंना मार्गदर्शन केले. त्यांनी घडविलेले फुटबाॅलपटू पोलीस दलासह महापालिका, महसूल, विद्यापीठ, सैन्यदलात नोकरीस लागले होते. विद्यार्थ्यांना चांगले वळण लागावे या तळमळीतून ते काम करीत. राज्याच्या कानाकोपऱ्यांत शालेय फुटबॉलमध्ये महाराष्ट्र हायस्कूल संघाचा दबदबा निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

त्यांच्या कार्याची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा परिषदेने १९८० मध्ये त्यांना ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. राज्य सरकारचा १९९१ मध्ये ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ मिळाला होता. कोल्हापूर महापालिकेने २००१ मध्ये ‘कोल्हापूर भूषण’ पुरस्कारांनी गौरव केला होता. त्यांचे ‘कवडसा’ या नावांनी आत्मकथनही प्रकाशित झाले आहे. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या वाटचालीवर आधारित ‘बहुजनपर्व’या ग्रंथाचे संपादन व लेखन आप्पासाहेब वणिरे यांनी केले होते.

चार दिवसांपूर्वी त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले. त्यातच तीन दिवसांपूर्वी रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. रविवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सोमवारी सकाळी शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळाशेजारील घरी कोल्हापूरच्या सामाजिक, क्रीडा, राजकीय, आदी क्षेत्रांतील दिग्गजांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत पार्थिवाचे दर्शन घेतले. मोजक्याच नातेवाईक, मित्रमंडळांच्या उपस्थितीत पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘केपीएल’साठी मोठे योगदान

कोल्हापूरच्या फुटबाॅलमध्ये खेळाडूंना भरगच्च मानधन देऊन लोकमत ने २०१० ते २०१२ या दरम्यान प्रथमच ‘लोकमत केपीएल’ स्पर्धा फुटबाॅलपंढरी शाहू स्टेडियमवर भरविली होती. त्यासाठी सलग तीन वर्षे वणिरे यांनी सामना निरीक्षक म्हणून उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली. ही स्पर्धा कोल्हापूरच्या इतिहासात संस्मरणीय ठरली.

फोटो : ०५०४२०२१-कोल-आप्पासाहेब वणिरे (निधन)