शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अपार्टमेंट, सोसायटीमधील फ्लॅटधारकांसाठी ‘अच्छे दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 14:12 IST

राज्य शासनाने केलेल्या नवीन नियमावलीमुळे अनेक वर्षे रखडलेली अपार्टमेंट, हाऊसिंग सोसायटीमधील फ्लॅट नावावर करण्याची संधी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र फ्लॅट ओनर्स अँड रेसिडेंट्स फॉर लिगल राईट्स प्रोटेक्शन फोर्ट व सुविधा सेवा केंद्राच्या मदतीने शासनाच्या या योजनेचा सहज व सुलभ लाभ घेता येत आहे. अनेक वर्षे फ्लॅट नावावर झाला नसलेल्यांना हे फायदेशीर ठरत आहे.

ठळक मुद्दे केवळ स्टॅम्प ड्यूटी जमा करून फ्लॅट नावावर करण्याची संधी अनेक वर्षे मिळकत नावावर नसणाऱ्यांसाठी प्रभावी योजना

कोल्हापूर : राज्य शासनाने केलेल्या नवीन नियमावलीमुळे अनेक वर्षे रखडलेली अपार्टमेंट, हाऊसिंग सोसायटीमधील फ्लॅट नावावर करण्याची संधी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र फ्लॅट ओनर्स अँड रेसिडेंट्स फॉर लिगल राईट्स प्रोटेक्शन फोर्ट व सुविधा सेवा केंद्राच्या मदतीने शासनाच्या या योजनेचा सहज व सुलभ लाभ घेता येत आहे. अनेक वर्षे फ्लॅट नावावर झाला नसलेल्यांना हे फायदेशीर ठरत आहे.अपार्टमेंट, हाऊसिंग सोसायटीमध्ये फ्लॅट घेतलेल्या अनेकांच्या नावे मिळकतीची नोंद झालेली नाही. अशा मिळकतींचे खरेदीपत्र झाले नसल्यामुळे मिळकतधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. गरजेवेळी फ्लॅटवर कर्ज काढता येत नाही. या संदर्भात मार्ग काढण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात आले.

अखेर राज्य शासनाने २८ आॅगस्ट २०१९ रोजी फ्लॅट आणि जागेची नोंदणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार करण्यासाठी होणाऱ्या नव्या कायद्यानुसार इमारतीची जागा हस्तांतरण करण्याच्या धोरणात बदल केले. यामुळे आवश्यकतेनुसार मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) जमा करून फ्लॅट नावावर करणे शक्य झाले.

अनेकांना मात्र, शासनाच्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे माहीत नाही. मुंबईमध्ये अनेक अपार्टमेंट आणि सोसायटीमधील फ्लॅट संबंधितांच्या नावे झालेले नाहीत. महाराष्ट्र फ्लॅट ओनर्स रेसिडेंट्स युनिट फॉल लीगल राईट्स प्रोटेक्शन फोर्ट व सुविधा सेवा केंद्राने संबंधितांची सोयीसाठी विशेष मोहीमच सुरू केली आहे. यामध्ये संबंधितांना तांत्रिक साहाय्य, अर्धवट प्रकरणे पूर्ण करणे यांसह आवश्यक माहिती संकलनासाठी सहकार्य केले जात आहे.

मुंबईमध्ये २८ हजारांपेक्षा जास्त हौसिंग सोसायटी आहेत. त्यापैकी २५ टक्के मिळकतधारकांचे फ्लॅट नावावर नाहीत. पुण्यामध्येही हीच स्थिती आहे. कोल्हापुरात हौसिंग सोसायटीमधील फ्लॅट नावावर आहेत. मात्र, १०० पेक्षा जास्त अपार्टमेंटमधील फ्लॅट संबंधितांच्या नावावर नाहीत, हे वास्तव आहे. राज्य शासनाच्या नवीन योजनेमुळे केवळ स्टँप ड्यूटी जमा करून फ्लॅट नावावर करता येणार आहे. शासनाने चांगली योजना आणली आहे. कोल्हापुरातील संबंधितांना योजनेची अधिक माहिती पाहिजे असल्यास सहकार्य केले जाईल.- व्ही. बी. पाटील,अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर