शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

करवीर भगिनी मंडळाच्या निवेदिता बेनाडीकर अध्यक्ष, उपाध्यक्षपदी अनघा सातोसकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 18:08 IST

करवीर भगिनी मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत प्रस्थापित गटातील सर्व महिला सदस्य विजयी झाल्या. संस्थेच्या अध्यक्षपदी निवेदिता बेनाडीकर यांची तर उपाध्यक्षपदी अनघा सातोसकर यांनी निवड करण्यात आली.

ठळक मुद्देकरवीर भगिनी मंडळाच्या निवडणुकीत प्रस्थापित गट विजयीत्रैवार्षिक निवडणूक : निवेदिता बेनाडीकर अध्यक्ष

कोल्हापूर : करवीर भगिनी मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत प्रस्थापित गटातील सर्व महिला सदस्य विजयी झाल्या. संस्थेच्या अध्यक्षपदी निवेदिता बेनाडीकर यांची तर उपाध्यक्षपदी अनघा सातोसकर यांनी निवड करण्यात आली.एस. टी. स्टँड परिसरातील करवीर भगिनी मंडळ ही महिलांची सार्वजनिक संस्था असून संस्थेचे स्वमालकीचे बहुद्देशीय हॉल व नोकरदार महिलांसाठीचे वसतिगृह आहे.

संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत प्रस्थापित मंडळाच्या विरुद्ध प्रभा भागवत व प्रिया जाधव या दोन उमेदवारांनी अर्ज भरल्याने निवडणूक प्रक्रिया करावी लागली. त्यात २१३ सभासदांनी मतदान केले त्यापैकी २०१ मते वैध ठरली. त्यात सभासद महिलांनी जुन्या कार्यकारी मंडळाच्या सर्व सदस्यांना भरघोस मतांनी निवडून दिले.विजयी झालेल्या सदस्यांमधून निवेदिता बेनाडीकर यांची अध्यक्षपदी व अनघा सातोसकर यांनी उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. अन्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणे - सचिव : योगशीला महागांवकर, सहसचिव : मनिषा जाधव, ट्रेझरर : इला कापडियाा, सदस्य : अर्चना सावंत, तेजस्विनी मोहिते, शीतल भुरे, इंद्रसेना माने, स्वीकृत सदस्य : विद्या बेनाडीकर.

प्रस्थापित कार्यकारी मंडळाने सन २०१२ मध्ये संस्थेची जागा वाचवून संस्थेचे अस्तित्व टिकवले. गेल्या सहा वर्षांत आर्थिक प्रगती करून बहुद्देशीय हॉल व महिला वसतिगृहाची दुरूस्ती व नूतनीकरण केले. या कार्याची पोचपावती सभासदांनी निवडणुकीच्या माध्यमातून दिल्याची प्रतिक्रिया कार्यकारी मंडळाने दिली. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWomenमहिलाElectionनिवडणूक