शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना चाचणीसाठी जयसिंगपूरमध्ये अ‍ँन्टीजेन टेस्टिंग सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 18:26 IST

जयसिंगपूर येथे डॉ. जे. जे. मगदूम चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. मोदी हॉस्पिटलमध्ये सुरु होत असलेल्या अ‍ँन्टेजेन टेस्टिंग सेंटरमुळे रुग्णांना तातडीने अहवाल मिळवून त्यांच्यावर उपचार करण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.

ठळक मुद्देकोरोना चाचणीसाठी जयसिंगपूरमध्ये अ‍ँन्टीजेन टेस्टिंग सेंटर सुरू-राजेंद्र पाटील-यड्रावकररुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य विभागाने घेतला निर्णय

कोल्हापूर : जयसिंगपूर येथे डॉ. जे. जे. मगदूम चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. मोदी हॉस्पिटलमध्ये सुरु होत असलेल्या अ‍ँन्टेजेन टेस्टिंग सेंटरमुळे रुग्णांना तातडीने अहवाल मिळवून त्यांच्यावर उपचार करण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांच्या हस्ते जयसिंगपूर येथील डॉ.जे. जे. मगदूम चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. मोदी हॉस्पिटलमध्ये सुरु करण्यात आलेल्या अ‍ँन्टेजेन टेस्टिंग सेंटरचा शुभारंभ आज करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ. नीता माने, शिरोळचे नगराध्यक्ष डॉ. अमरसिंह माने-पाटील, प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. केम्पी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दातार, गटविकास अधिकारी कवितके, डॉ. जे. जे. मगदूम चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख विजय मगदूम, जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. खटावकर यांच्यासह इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, डॉक्टर्स तसेच आरोग्य विभागाकडील अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले, जिल्ह्ययात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रुग्ण वाढीमुळे जिल्ह्यामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या शासकीय टेस्टिंग लॅबवरती स्वॅब तपासणीसाठी ताण पडत आहे.

कोरोना चाचणी सॅम्पल्स वाढल्यामुळे रुग्णांना तातडीने रिपोर्ट देणे आणि उपचार करणे गैरसोयीचे ठरत आहे. यामुळे आरोग्य विभागाने राज्यात अनेक ठिकाणी पर्यायी व्यवस्था उभारण्यास सुरुवात केली असून जयसिंगपूर येथे डॉ.जे. जे. मगदूम चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. मोदी हॉस्पिटलमध्ये सुरु होत असलेले अ‍ँन्टेजेन टेस्टिंग सेंटर याचाच भाग आहे.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. केम्पी-पाटील म्हणाले, आरोग्य विभागाच्यावतीने या ठिकाणी विनामूल्य सेवा दिली जाणार आहे, अगदी कमी वेळेमध्ये कोरोनाचे निदान होण्यासाठी या टेस्टिंग सेंटरचा उपयोग होईल.

या सेंटरमुळे आरोग्य प्रशासनावरील ताण कमी होऊन नागरिकांना अल्पावधीत टेस्टिंगचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यामुळे कोरोना बाबतची प्राथमिक लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तातडीने या टेस्टिंग सेंटरमध्ये संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरministerमंत्री