शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वटपौर्णिमा पूजेवेळीही केली ॲन्टिजन चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 18:56 IST

Religious programme Kolhapur : अखंड सौभाग्य आणि जन्मोजन्मी पतीची साथ मागत गुरुवारी सौभाग्यवतींनी वटपौर्णिमा साजरी केली. वडाच्या फांद्या पूजण्याऐवजी प्रत्यक्ष वडाच्या झाडाचे पूजन आणि वडाचे झाड लावून महिलांनी पर्यावरणसंवर्धनाचा संदेश दिला. दुसरीकडे या महिलांचे आरोग्याची काळजी घेत आरोग्य यंत्रणेने वडपूजनाच्या ठिकाणीच ॲन्टिजन तपासणी केली.

ठळक मुद्देवटपौर्णिमा पूजेवेळीही केली ॲन्टिजन चाचणी पर्यावरणपूरक सण : फांद्या तोडण्यापेक्षा झाडाचेच पूजन

कोल्हापूर : अखंड सौभाग्य आणि जन्मोजन्मी पतीची साथ मागत गुरुवारी सौभाग्यवतींनी वटपौर्णिमा साजरी केली. वडाच्या फांद्या पूजण्याऐवजी प्रत्यक्ष वडाच्या झाडाचे पूजन आणि वडाचे झाड लावून महिलांनी पर्यावरणसंवर्धनाचा संदेश दिला. दुसरीकडे या महिलांचे आरोग्याची काळजी घेत आरोग्य यंत्रणेने वडपूजनाच्या ठिकाणीच ॲन्टिजन तपासणी केली.ज्या दिवशी वडाच्या झाडाखाली पतीचे गेलेले प्राण सावित्रीने परत आणले तो दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने महिलांना ऑक्सिजनचे स्रोत असलेल्या वडाच्या झाडाचा काही काळासाठी सहवास लाभतो. व्रतामागे असलेल्या पौराणिक कथेला पर्यावरणाशी जोडणाऱ्या या सणानिमित्त गुरुवारी विवाहीत महिलांनी वडाच्या झाडाचे पूजन केले.

सकाळपासूनच पारंपरिक काठापदराची साडी, साजश्रृंगार केलेल्या महिला भागातील वडाच्या झाडाच्या पूजनासाठी एकत्र जाताना दिसत होत्या. त्यामुळे शहरात चौकांमध्ये, रस्त्याकडेला असलेल्या वडाच्या झाडाभोवती सवासिनींची गर्दी दिसत होती. महिलांनी वडाच्या झाडाची आंबा, फणस, जांभूळ, केळी अशा फळांची ओटी भरून पूजा केली.

दोर बांधून सात फेऱ्या मारताना जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी कामना केली. गेल्या काही वर्षात या सणासाठी वडाच्या फांद्या तोडण्याचे प्रमाण वाढले होते, आता महिलांमध्येही पर्यावरणाविषयी जागृती झाल्याने घराजवळील वडाच्या झाडाचे पूजन करण्याला प्राधान्य देण्यात आले. अनेक जणींनी त्या पुढचे पाऊल टाकत वडाचे झाड लवून हा दिवस साजरा केला.सध्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असल्याने जिल्हा प्रशासनाने चाचण्यांची संख्याही वाढवली आहे, दिसेल तिथे ॲन्टिजन चाचणी केली जात आहे, याला वटपौर्णिमादेखील अपवाद राहिली नाही. महिलांची गर्दी होते त्याठिकाणी आरोग्य यंत्रणेकडून ॲन्टिजन टेस्ट केली जात होती. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमkolhapurकोल्हापूर