कुरुंदवाड : शहरातील कोरोना संसर्ग आटोक्यात आला असलातरी पालिका प्रशासनाने निर्बंध अद्याप कडक केले आहेत. शहरात विनाकारण फिरणा-या, मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणा-यांवर दंडात्मक कारवाई करत अॅन्टिजन तपासणी मोहीम राबविली. मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका चौकात पालिका कर्मचारी, पोलीस प्रशासन यांनी ही कारवाई केली. शुक्रवारी दुपारपर्यंत ११५ जणांची अॅन्टिजन तपासणी करण्यात आली. तर पाच हजारांवर दंड वसूल केला आहे. या कारवाईची निर्बंध न पाळणा-यांनी धास्ती घेतली आहे.
लॉकडाऊन आणि कोरोना साखळी तोडण्यासाठी घालण्यात आलेल्या निर्बंधाचे मुख्याधिकारी जाधव यांनी कडक अंमलबजावणी केल्याने शहरातील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात राखण्यात पालिका प्रशासन यशस्वी ठरली आहे. शासनाने लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिल केल्याने शहरातील गर्दी वाढत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. त्याचा परिणाम रुग्णसंख्या वाढीवर होऊ नये यासाठी मुख्याधिकारी जाधव निर्बंध मोडणा-यांवर कडक कारवाईची भूमिका घेतली आहे. या मोहिमेत पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळत आहे. या मोहिमेत पालिका करनिरीक्षक प्राची पाटील, अर्जुन पाटील, दत्तात्रय मगदूम, दिनेश हतळगे, निशिकांत ढाले, शशिकांत कडाळे यांच्यासह पालिका कर्मचारी सहभागी झाले होते.
फोटो - १८०६२०२१-जेएवाय-०६
फोटो ओळ - कुरुदंवाड येथील पालिका चौकात विनामास्क फिरणा-यांची पालिकेकडून अॅन्टिजन तपासणी करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी निखिल जाधव, करनिरीक्षक प्राची पाटील उपस्थित होत्या.