शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur -कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणखी एकजण कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 18:49 IST

शाहूवाडी तालुक्यातील उचत इथल्या ३४ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यात आढळलेल्या चारपैकी दोन रुग्णांचे पहिले आणि दुसरे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे दिलासा मिळालेला असतानाच आता शाहुवाडी तालुक्यातील उचतच्या तरुणाला कोरोना झाल्याचे वृत्त आले आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणखी एकजण कोरोना पॉझिटिव्हकोल्हापूर जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील उचत इथल्या ३४ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यात आढळलेल्या चारपैकी दोन रुग्णांचे पहिले आणि दुसरे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे दिलासा मिळालेला असतानाच आता शाहुवाडी तालुक्यातील उचतच्या तरुणाला कोरोना झाल्याचे वृत्त आले आहे.कोरोना झालेल्या शाहुवाडी तालुक्यातील हा तरुण दिल्लीमधील तबलिग जमातच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला होता. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचे एकुण चार रुग्ण आहेत. त्यापैकी पेठवडगाव येथील युवती मिरज येथे उपचार घेत आहे तर भक्तीपूजानगर येथील बहिणभावांवर सीपीआरच्या कोरोना केंद्रात उपचार सुरु आहेत. कसबा बावडा येथील चौथ्या रुग्णावरही सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत.

दिल्लीतील मरकजहून जिल्ह्यात परतलेल्या शाहूवाडी तालुक्यातील ३० वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आज आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली.

हा तरुण दिल्ली येथून १४ मार्च रोजी निघून १६ ला कोल्हापुरात पोहोचला. येथील धार्मिक स्थळामध्ये एक दिवस राहून तो मलकापूरला खासगी वाहनातून गेला. मलकापूरमधील धार्मिक स्थळातही तो एक दिवस राहिला. यानंतर तो आपल्या घरी दि १८ मार्चला घरी परतला. शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील कोरोना पॉझिटिव्ह आलेला रुग्ण फक्त एक दिवस नमाज पडण्यासाठी म्हणून दिल्लीला गेला होता अशी माहिती तपासात पुढे आली आहे.तो महावितरणमध्ये नोकरीस आहे. दिल्लीहून आल्यानंतर त्याचा मुक्काम कोल्हापूरातील बागल चौकातील मशिदीमध्ये होता. तेथून त्यांना खासगी गाडीने मलकापूरला नेण्यात आले. त्यानंतर तो मलकापूरच्या मशिदीमध्ये दोन दिवस मुक्कामास होता..तिथे अनेकांना भेटला..सासुरवाडी परळे निनाईला गेला होता..तिथे तो गल्लीतील सर्वांना भेटला असल्याची माहिती पुढे आली आहे.

पन्हाळा येथील संस्थात्मक अलगीकरण केंद्रात १ एप्रिलला प्रशासनामार्फत दाखल करण्यात आले होते. मरकजहून परतलेल्या अन्य प्रवाशांसोबतच याचा स्वॅब घेण्यात आला होता. त्यात त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह  आला. त्याला  आज सीपीआरमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याला कोल्हापुरातून मलकापूरला घेवून जाणाऱ्या त्याच्या संपर्कातील अन्य चौघांची तपासणीही करण्यात येत आहे.पन्हाळा शहरासह नरके पब्लिक स्कुलपासुन पाच कि.मी.परीसर  सील 

शाहुवाडी तालुक्यातील उचतमधील हा तरुण १ एप्रिलपासुन पन्हाळा येथील नरके पब्लिक स्कुल मध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्षात होता. तबलिग जमातच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले शाहुवाडी तालुक्यातील २७ जण विलगीकरण कक्षात आहेत. त्या सर्वांची तपासणी होणार असुन पन्हाळा शहरासह नरके पब्लिक स्कुलपासुन पाच कि.मी.परीसर आज सील केला आहेदरम्यान, पेठवडगाव येथील कोरोनाग्रस्त युवतीचा दुसरा तर भक्तीपुजानगर येथील व्यक्तीचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे. याशिवाय गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा येथील १२ जणांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने कोल्हापूरकराना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर