शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

corona virus इचलकरंजीत आणखीन एक कोरोना पॉझिटिव्ह; प्रशासनासह शहरवासीयांत खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 18:36 IST

याचा सोमवारी दुपारी अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, ह्यत्याह्ण व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांसह संपर्कातील व्यक्तींचे स्त्राव घेवून तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. त्यांच्या शेजारचे एक कुटुंब त्यांच्या संपर्कात आले आहे. त्याचबरोबर संबंधित रुग्ण चार दिवसांपूर्वी सुतार मळा परिसरातील एका दुकानात बसायला जात होता.

ठळक मुद्दे३०० मीटर एरीया सील

इचलकरंजी : येथील नदीवेस परिसरातील एका ७० वर्षीय वृद्धाचा ह्यकोरोनाह्ण अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनासह शहरवासीयांत खळबळ उडाली. प्रशासनाने या परिसरात आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर सुरू केल्या असून, संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील चौघांना तपासणीसाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इचलकरंजीतील पॉझिटिव्ह संख्या तीनवर पोहचली असून, त्यातील एकजण मरण पावला आहे.

विशेष म्हणजे पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण हा गेल्या महिन्याभरात कोठेही बाहेरगावी प्रवास केल्याचे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे त्याला लागण कशामुळे झाली, याची माहिती घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. त्याला उच्च रक्तदाब व फुफ्फुसाचा त्रास आहे. हा व्यक्ती त्रास होत असल्याने २ मे रोजी पहाटे आयजीएम रुग्णालयात तपासणीसाठी म्हणून आला होता. त्यावेळी त्याला दाखल करून घेतले. परंतु त्याचा त्रास वाढल्याने त्याला त्याचदिवशी सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले होते. रविवारी (दि.३) त्याचा स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला.

याचा सोमवारी दुपारी अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, ह्यत्याह्ण व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांसह संपर्कातील व्यक्तींचे स्त्राव घेवून तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. त्यांच्या शेजारचे एक कुटुंब त्यांच्या संपर्कात आले आहे. त्याचबरोबर संबंधित रुग्ण चार दिवसांपूर्वी सुतार मळा परिसरातील एका दुकानात बसायला जात होता. त्यामुळे त्या दुकानदारासह अन्य संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही तपासणी करण्यात येणार आहे.

पॉझिटिव्ह आढळलेला व्यक्ती सिकंदर दर्गामागे मुजावर पट्टी नदीवेस नाका या परिसरातील असल्याने तेथून ३०० मीटर अंतरापर्यंतच्या चारही बाजूंच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. तसेच प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी संबंधित क्षेत्र प्रतिबंधित घोषित केले आहे.

शहरातील ह्यकोरोनाह्ण पॉझिटिव्हची संख्या तीनवर पोहचली असून, त्यातील एका साठ वर्षीय वृद्धाचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. तर एका चार वर्षीय बालकावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर नदीवेस परिसरातील हा तिसरा रुग्ण नव्याने आढळल्यामुळे इचलकरंजीत भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसराला पोलिस उपअधीक्षक गणेश बिरादार यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या.भागात औषध फवारणीसंबंधित परिसरात नगरपालिकेच्यावतीने औषध फवारणी करण्यात आली असून, बारा पथके स्थापन करून आज, मंगळवार सकाळपासून घर टू घर सर्व्हे सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर परिसरातील सर्वांना आरोग्य सेतू अ‍ॅप वापरण्यास सूचना देण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या