शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
3
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
4
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
5
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
6
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
8
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
9
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
10
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
11
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
12
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
13
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
14
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
15
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
16
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
17
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
18
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
19
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
20
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!

मुलींना मोफत शिक्षण कधी?, द्यावा लागतोय विकास निधी; पालकांना भुर्दंड

By पोपट केशव पवार | Updated: September 28, 2024 15:45 IST

उच्च शिक्षण मोफत नावालाच 

पोपट पवार कोल्हापूर : राज्यातील मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची घोषणा करत सरकारने या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू केली. मात्र, महाविद्यालये विकास निधीच्या नावाखाली शुल्क आकारत असल्याने हे कसले मोफत शिक्षण, अशी म्हणण्याची वेळ पालकांवर आली आहे.व्यावसायिकाच्या ६०० अभ्यासक्रमांमध्ये मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केली. या निर्णयानुसार मुलींना शिक्षणासाठी एक रुपायाही भरावा लागणार नाही, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते.मात्र, सध्या महाविद्यालये विकास निधीच्या नावाखाली विद्यार्थिनींकडून शुल्क आकारत आहेत. प्रत्येक महाविद्यालयांची विकासनिधीची रक्कम ही वेगवेगळी असून, पालकांना १५ ते ३० हजार रुपयांपर्यंत विकास निधी द्यावा लागत आहे. सरकारने केवळ शैक्षणिक शुल्क माफ केले. महाविद्यालयांमधील इतर शुल्काचा भुर्दंड मात्र विद्यार्थिनींना सोसावा लागत असल्याचे चित्र आहे.प्रत्येक वर्षी द्यावा लागेल विकासनिधीअभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क किती यावरून दहा ते पंधरा टक्के विकासनिधी शुल्क घेतले जाते. इंजिनिअरिंगचे शैक्षणिक शुल्क एक लाख रुपये असेल, तर दहा ते पंधरा हजार रुपये विकासनिधी द्यावा लागत आहे. चारही वर्षे हे शुल्क द्यावे लागणार आहे.कर्ज काढण्याची वेळइंजिनिअरिंग, वैद्यकीय या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क हे इतर अभ्यासक्रमांपेक्षा जास्त आहे. या शुल्काच्या दहा ते पंधरा टक्के रक्कम भरण्याची परिस्थितीही काही पालकांची नाही. त्यांना यासाठीही कर्ज काढावे लागते. त्यामुळे सरकारने जसे शैक्षणिक शुल्क माफ केले तसा विकासनिधीही महाविद्यालयांनी घेऊ नये, अशा सूचना देणे गरजेचे आहे.

काय माफ?शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क

काय द्यावे लागणार?विकासनिधी शुल्क, वसतिगृह शुल्क, महाविद्यालयांमधील उपक्रमांसाठीचे शुल्क

आधी पैसे भरा, नंतर परत करूविद्यार्थिनींकडून एकही रुपया शैक्षणिक शुल्क घेऊ नका असे सरकारचे आदेश आहेत. मात्र, काही महाविद्यालये आधी पैसे भरा, नंतर परत करू, असे सांगत पैसे घेत असल्याचे चित्र आहे. यामुळे पालक संभ्रमात आहेत.

महाविद्यालयांनी विद्यार्थिनींकडून एकही रुपया शैक्षणिक शुल्क घेऊ नये, असे बंधनकारक आहे. जूनमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय किंवा त्यापुढील वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींचे शैक्षणिक शुल्क माफ आहे. - डॉ. धनराज नाकाडे, सहसंचालक, उच्च व तंत्र शिक्षण, कोल्हापूर विभाग.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालय