शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊंच्या नव्या रयत क्रांती संघटनेची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 18:04 IST

कोल्हापूर, दि. २१ : कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज, गुरुवारी कोल्हापुरातील शाहू सांस्कृतिक मंदिरातील कार्यक्रमात रयत क्रांती संघटनेची घोषणा केली. संवादातून संघर्षाकडे असे संघटनेचे घोषवाक्य असून प्रदेशाध्यक्षपदी सुरेशदादा पाटील यांची निवड करण्यात आली असून येत्या ३0 सप्टेंबर रोजी उसाचा दर ठरविणार असून तोच अंतिम राहील, अशी घोषणाही ...

ठळक मुद्देसुरेशदादा पाटील प्रदेशाध्यक्ष, युवक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी शार्दूल जाधव३0 तारखेला उसाचा दर ठरविणार, तोच अंतिम राहणार, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत घोषणारयत क्रांती संघटनेच्या लोगोचे अनावरण करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शनराजू शेट्टीवर टीका करणे टाळले

कोल्हापूर, दि. २१ : कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज, गुरुवारी कोल्हापुरातील शाहू सांस्कृतिक मंदिरातील कार्यक्रमात रयत क्रांती संघटनेची घोषणा केली. संवादातून संघर्षाकडे असे संघटनेचे घोषवाक्य असून प्रदेशाध्यक्षपदी सुरेशदादा पाटील यांची निवड करण्यात आली असून येत्या ३0 सप्टेंबर रोजी उसाचा दर ठरविणार असून तोच अंतिम राहील, अशी घोषणाही यावेळी खोत यांनी केली.

सदाभाऊ खोत यांच्या नवीन शेतकरी संघटनेबाबत राज्यभर चर्चा होती. त्यानुसार गुरुवारी सदाभाऊंनी कोल्हापूरात येताच सर्वप्रथम अंबाबाईचे दर्शन घेतले आणि राज्यभरातून जमलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नव्या संघटनेची घोषणाही केली.

राजर्षी शाहू महाराजांचे आशीर्वाद घेऊन रयत क्रांती संघटनेच्या लोगोचे अनावरण सदाभाऊ यांनी केले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढून टाकल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी नवीन संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेले महिना-दीड महिना त्यांनी संपूर्ण राज्याचा दौरा करून कार्यकर्त्यांची मते अजमावून घेतल्यानंतर त्यांनी संघटना स्थापनेचा मुहूर्त ठरविला आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर त्यांनी आपल्या या नवीन संघटनेची अधिकृत घोषणा केली.

राज्यमंत्री खोत यांनी गुरुवारी सकाळी करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर दुपारी शाहू मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक मंदिर येथे मेळाव्यात जिल्ह्यातील शेतकºयांसमोर नव्या संघटनेची घोषणा केली.

या मेळाव्यात युवक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी शार्दूल जाधव यांच्या नावाचीही घोषणा करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राजू सावंत, भरत पाटील आदी उपस्थित होते.३0 सप्टेंबरला उसाचा दर जाहीर करणार

घटस्थापनेच्या मुहूर्तावर नवीन संघटनेची घोषणा करतानाच खोत यांनी इचलकरंजी येथे ३० सप्टेंबरला होणाºया दसरा मेळाव्यात उसाचा दर मीच ठरविणार आणि तोच अंतिम राहिल, अशी घोषणाही केली. याच मेळाव्यात संघटनेची पुढील दिशा स्पष्ट केली जाणार आहे.राजू शेट्टीवर टीका करणे टाळले

कोल्हापूरात झालेल्या मेळाव्यात सदाभाऊ यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर टीका करणे टाळले. या मेळाव्यात त्यांनी कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करणे टाळले.