शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘अण्णा, आप जिंदा हो हर लहू के कतरे में’

By admin | Updated: May 21, 2015 00:55 IST

पानसरेंच्या स्मृतींचा जागर : ‘मॉर्निंग वॉक’ करून सरकारचा निषेध

कोल्हापूर : ‘कॉम्रेड, आप जिंदा हो... हरएक लहू के कतरे में...’ ‘अण्णा, आप जिंदा हो, हरएक लहू के कतरे में..लाल सलाम के नारेंमे..’ असा अंगावर काटा आणणारा आवाज बुधवारी सकाळी उमटला. निमित्त होते, ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागावा या मागणीसाठी काढलेल्या ‘मॉर्निंग वॉक’चे. समाजाच्या विविध स्तरांतील लोक अण्णा ज्या मार्गावरून ‘मॉर्निंग वॉक’ ला जात होते, त्याच मार्गावरून चालत गेले व अण्णा, तुमचा वसा आम्ही सोडणार नाही असाच विश्र्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी निष्क्रिय सरकारचा धिक्कार करण्यात आला. गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर २० फेब्रुवारीला त्यांचे निधन झाले. त्या दिवसाची स्मृती कायम राहावी व मारेकऱ्यांचा शोध लागावा, या उद्देशाने दर महिन्याच्या २० तारखेला सकाळी साडेसहा वाजता पानसरे यांच्यावर जिथे हल्ला झाला, त्या ठिकाणाहून या मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमास बुधवारी सकाळी साडेसहा वाजता सम्राटनगर येथून सुरुवात झाली. यामध्ये सर्वजण ‘आम्ही सारे पानसरे’ या लाल रंगाच्या गांधी टोप्या घालून सहभागी झाले.‘शहीद कॉम्रेड अमर रहे, निर्भय बना, विवेकी बना, अब लढाई आर या पार, बंदुकीच्या गोळ्या शरीराला मारू शकतात, विचाराला नाही’ या आशयांची पोस्टरही फेरीमध्ये होती. विद्यापीठाच्या परीक्षा भवनाच्या कट्ट्यावर फिरून आल्यावर पानसरे थोडा वेळ बसत असत. तिथे रणजित कांबळे व ज्योती भालकर यांनी क्रांतीचे गीत गावून जागर केला. या मॉर्निंग वॉकचा प्रतिभानगरातील हुतात्मा स्मारकमध्ये समारोप झाला. मेघा पानसरे यांनी उपक्रमामागील भूमिका सांगितली. पानसरे यांना श्रध्दांजली वाहून हा उपक्रम संपला. यामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, नामदेव गावडे, दिलीप पवार, अतुल दिघे, डॉ. शरद भुताडिया, मेघा पानसरे, जीवन बोडके, प्रा.अनिता बोडके, डॉ. सुभाष जाधव, स्मिता पानसरे, उमेश सूर्यवंशी, रमेश वडणगेकर, मिलिंद यादव, प्रभाकर आरडे, पांडुरंग लव्हटे, भगवान पाटील, प्रा. विलास रणसुभे, निहाल शिपूरकर, सीमा पाटील, रसिया पडळकर, अनुराधा मेहता, सुनीता जाधव, रूपाली कदम, मल्हार पानसरे, कबीर पानसरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील नागरिक सहभागी झाले. क्रांती जागर सुरूचपानसरे यांची हत्या झाली म्हणून क्रांतीचा जागर कधीच थांबणार नाही. हा जागर असा सुरू ठेवला जाणार आहे. त्यांची स्मृती कायम राहावी व मारेकऱ्यांचा शोध लागावा, या उद्देशाने हा ‘मॉर्निंग वॉक’चा उपक्रम हाती घेतला आहे. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी सापडले नाहीत. तिथेही असाच उपक्रम सुरू आहे, असे मेघा पानसरे यांनी सांगितले. भाषण ऐकवणार गोविंद पानसरे यांच्या हत्येपूर्वीचे त्यांचे पुण्यातील अखेरचे भाषण ऐकविण्याचा उपक्रम दलितमित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालयाच्यावतीने हाती घेण्यात आला आहे. शहरात त्याचे आयोजन करणार असल्याचे सुरेश शिपूरकर यांनी सांगितले. ५पुतळ्यासाठी जागेची मागणी पानसरे यांचा कोल्हापुरात पुतळा उभारण्यासाठी महापालिकेकडे जागा मागितली आहे. प्रतिभानगरातील हुतात्मा स्मारकमध्येच हा पुतळा बसविला जावा असा प्रयत्न असल्याचे मिलिंद यादव यांनी सांगितले.