शहरं
Join us  
Trending Stories
1
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
2
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
3
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
4
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
5
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
6
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
7
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
8
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी, 'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
9
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
10
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
11
IND vs WI 2nd Test Day 4 Stumps : मॅच टीम इंडियाचीच! पण चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज टीम जिंकली
12
२३ मुलांचे बळी घेणाऱ्या 'श्रेसन फार्मा'चा परवाना रद्द; ३०० वेळा उल्लंघन करणाऱ्या कंपनीला ठोकलं टाळं
13
सौदीत जाऊन योगी आदित्यनाथांबद्दल आक्षेपार्ह फोटो केला पोस्ट, अखेर तावडीत सापडलाच
14
म्हणून त्याला किंग खान म्हणतात! 'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीला ड्रेसमुळे चालताच येईना, शाहरुखची 'ती' कृती प्रेक्षकांना भावली
15
भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न'
16
मतचोरीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका, न्यायमूर्तींनी दिला मोठा निर्णय, सुप्रिम कोर्टात काय घडलं?
17
टाटा-इन्फोसिससह 'हे' शेअर्स आपटले; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा लाल रंगात; 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
18
चीननंतर अमेरिकेने सुरू केली भारताची हेरगिरी; पाळत ठेवण्यासाठी 'ओशन टायटन'ला पाठवले, कारण...
19
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
20
DSP सिराज नंबर वन! झिम्बाब्वेच्या गड्याला टाकले मागे; पण इथं टॉप ५ मध्ये दिसत नाही बुमराहचं नाव

अण्णा मोगणे, मयूर स्पोर्टस् अंतिम फेरीत

By admin | Updated: January 10, 2015 00:19 IST

संजय देसाई स्मृती चषक

कोल्हापूर : अण्णा मोगणे सहारा स्पोर्टस्ने युनायटेड स्पोर्टस्चा पराभव करीत, तर मयूर स्पोर्टस्ने फायटर्स स्पोर्टस्चा पराभव करीत कै. प्रा. संजय देसाई स्मृती टी-२० चषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. शाहूपुरी जिमखाना येथे आज, शुक्रवारी सकाळच्या सत्रातील पहिला सामना अण्णा मोगणे सहारा विरुद्ध युनायटेड स्पोर्टस् यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना अण्णा मोगणे सहारा संघाने १७ षटकांत ७ बाद १६९ धावांचे आव्हान युनायटेड स्पोर्टस् संघासमोर ठेवले. मोगणे संघाकडून युवराज यवलूस्करने ३३ धावा, तर सूरज शिंदे याने १७ चेंडूंत ३७ धावा केल्या. युनायटेडकडून सागर मेतकेने तीन, तर योगेश कळंत्रेने दोन बळी घेतले. उत्तरादाखल खेळताना फलंदाजीस आलेल्या युनायटेड संघाला हे आव्हान पेलवले नाही. मोगणे संघाच्या महेश पाटीलच्या भेदक गोलंदाजीसमोर युनायटेडचा निम्मा संघ गारद झाला. महेशला विकास जाधव व अतीश वरपे यांनी प्रत्येकी दोन बळी घेत मोलाची साथ देत युनायटेडला १७ षटकांत सर्वबाद १२५ धावांतच गारद करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. दुसरा सामना मयूर स्पोर्टस् विरुद्ध फायटर्स स्पोर्टस् यांच्यात झाला. मयूर स्पोर्टस्ने प्रथम फलंदाजी करताना १७ षटकांत ६ बाद १६४ धावा केल्या. यामध्ये अमोल निळुगडेने ३३ धावा, तर वैभव पाटील याने नाबाद २६ धावा केल्या. फायटर्सकडून आसिमपीर मुजावर यांने चार बळी घेतले. उत्तरादाखल फलंदाजीस आलेल्या फायटर्स संघाच्या फलंदाजांचा कणा मयूर संघाच्या अमोल निळुगडे, नजीर शेख, प्रसाद पाटील, संदीप साळोखे यांनी मोडला. त्यामुळे १५ षटकांत १०९ धावांत फायटर्सचा संघ गारद झाला. यामध्ये विशाल कुकडे याने ३० धावा करीत एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भेदक गोलंदाजीपुढे फायटर्सचा टिकाव लागला नाही. अखेर सामना ५५ धावांनी जिंकत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत मयूर संघाची गाठ अण्णा मोगणे संघाशी पडणार आहे.