शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

अण्णा भाऊ साठे जयंती विशेष: डॉ. आंबेडकरांची चळवळ अण्णा भाऊंच्या साहित्याची प्रेरणा

By संदीप आडनाईक | Updated: August 1, 2023 17:44 IST

‘श्रमिक प्रतिष्ठान’च्या पुस्तकातून माहिती प्रथमच उजेडात

कोल्हापूर : भारतातील साम्राज्यवादविरोधी राष्ट्रीय चळवळ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ या ज्येष्ठ लेखक अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या प्रेरणा असल्याचा संदर्भ शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे अधिव्याख्याता आणि अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे समन्वयक प्रा. रणधीर शिंदे आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर यांनी शोधला आहे. त्यांचे हे साहित्य श्रमिक प्रतिष्ठानने ‘युगांतर’मधील अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य या पुस्तकाद्वारे प्रकाशित केले आहे.अण्णा भाऊ साठे हे कम्युनिस्ट पक्षाच्या ‘युगांतर’ या साप्ताहिकात १९५०-६१ या काळात सातत्याने लिखाण करीत होते. त्यांनी त्या साप्ताहिकात लिहिलेल्या निवडक साहित्याचा संग्रह या पुस्तकरूपाने प्रकाशित झाले आहेत. ‘हवे ते लिहितो’ या लेखमालेत अण्णा भाऊंनी आपल्या साहित्याच्या प्रेरणा व त्याचे प्रयोजन याचे विवेचन केले आहे, अशी माहिती प्रा. रणधीर शिंदे यांनी दिली. या पुस्तकात अण्णा भाऊ म्हणतात, मार्क्सवाद-लेनिनवाद, भारतातील साम्राज्यवादविरोधी राष्ट्रीय चळवळ व डॉ. आंबेडकरांची चळवळ या आपल्या साहित्यनिर्मितीच्या प्रेरणा होत्या.या संग्रहातील त्यांच्या साहित्यातून महाराष्ट्रातील वारणा खोरे सर्व रस, रंग व गंध यासह प्रकट होते. त्यात मुंबईतील गरीब लोकांचा जगण्यासाठीचा संघर्ष व कामगारांचा लढाऊपणा दिसून येतो. त्यांच्या कविता वीररसाने ओथंबल्या आहेत. त्यांच्या दलित कथांचे वेगळेपण सर्वांचे लक्ष वेधणारे आहे. अण्णा भाऊंचे हे ‘युगांतर’मधील साहित्य त्यांच्या प्रतिभेचे नवदर्शन घडवून देते.या पुस्तकाचे संपादन डॉ. अशोक चौसाळकर व डॉ. रणधीर शिंदे यांनी केले आहे. डॉ. चौसाळकर शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातील निवृत्त प्राध्यापक आहेत तर प्रा. रणधीर शिंदे याच विद्यापीठाच्या मराठी विभागात अधिव्याख्याता आणि अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.प्रादेशिक भाषाशैलीत लेखनमुंबईतील लालबाग, परळ, गिरणगाव, चिरागनगर आणि कोल्हापूर, सांगली परिसरातील वारणा खोऱ्यातील गावरान मराठी या दोन्ही प्रदेशांतील विशिष्ट भाषाशैली अण्णा भाऊंच्या साहित्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

‘युगांतर’ या साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध झालेले हे लिखाण अण्णा भाऊंच्या साहित्याबद्दल नवी दृष्टी देणारे व यातील बहुतांश लेखन प्रथमत:च ग्रंथरूपाने प्रकाशित होत आहे. यातून वाचकांना अभ्यासकांना अण्णा भाऊंच्या लेखनाकडे पाहण्याची नवी दृष्टी प्राप्त होईल, असे वाटते. -डॉ. रणधीर शिंदे, समन्वयक, अण्णा भाऊ साठे अध्यासन, शिवाजी विद्यापीठ. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर