कोल्हापूर : येथील गृह पोलीस उपअधीक्षक किसन गवळी यांची नांदेड जिल्ह्याच्या बिलोली विभागाच्या पोलीस उपअधीक्षकपदी बदली झाली; तर त्यांच्या जागी करमाळा (सोलापूर) विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल पाटील यांची नियुक्ती झाली.गुन्हे अन्वेषण शाखा (सीआयडी)चे अप्पर पोलीस अधीक्षक सतीश माने यांची सिल्लोड- औरंगाबाद ग्रामीण, राज्य राखीव दलाचे सहायक समन्वयक रामचंद्र केडे यांची औरंगाबाद येथे बदली झाली. गृह विभागाच्या वतीने राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी जाहीर झाले. पोलीस उपअधीक्षक किसन गवळी यांच्याकडे गृह विभागाबरोबरच शाहूवाडी विभागीय पोलीस अधीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. अनिल पाटील यांनी यापूर्वी शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकपदाचा पदभार सांभाळला आहे. त्यांचे मूळ गाव शिगाव (जि. सांगली) आहे. दरम्यान, कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी काढले. (प्रतिनिधी)बदली झालेले पोलीस निरीक्षक गडहिंग्लज - रामदास जयसिंग इंगवले (पुणे ग्रामीण), विश्रामबाग सांगली- कृष्णदेव संभाजी पाटील (सातारा), वाहतूक शाखा, सांगली - संजय राजाराम गोरले (पुणे ग्रामीण), पंढरपूर मंदिर सुरक्षा - संजय महादेव गिड्डे (सातारा), वाहतूक शाखा, पुणे ग्रामीण - नितीन निळकंठ गोकावे (कोल्हापूर), जिल्हा विशेष शाखा पुणे ग्रामीण- मोहन तुळशीराम जाधव (सांगली). सहायक पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष, कोल्हापूर- अर्चना कडू बोदडे(पुणे ग्रामीण)
अनिल पाटील जिल्ह्याचे गृह पोलीस उपअधीक्षक
By admin | Updated: May 28, 2015 01:12 IST