शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविका मानधनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: April 28, 2015 00:34 IST

उपासमारीची वेळ : आठ महिन्यांपासून मानधन नाही

राजाराम कांबळे - मलकापूरशाहूवाडी तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या व बालविकास प्रकल्पाकडे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना राज्य शासनाने गेले आठ महिने मानधन दिलेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील सेविकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. गेले आठ महिने मानधनासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे.शाहूवाडी तालुक्याच्या डोंगर कपारीत २९१ अंगणवाडी व ३२ मिनी अंगणवाडी कार्यरत आहेत. तालुक्यात १३१ गावे व २५० वाड्या-वस्त्या आहेत. २९० अंगणवाडी सेविका, २८९ मदतनीस व २८ मिनी अंगणवाडी सेविका आहेत. त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून दर महिन्याला मानधन दिले जाते. यामध्ये केंद्र शासनाकडून राज्य शासनाला नियमित मानधन पाठविले जाते. त्यात राज्य शासनाकडून दर महिन्याला शाहूवाडी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना प्रतिमाह २ लाख २५ हजार ४८६ रुपये मानधन जमा केले जाते. गेले आठ महिने राज्य शासनाने तालुक्याचे १८ लाख ३ हजार ८८८ रुपये मानधन थकविले आहे.आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा यासाठी ग्रामीण महिला अंगणवाडी सेविका झाल्या; पण बिनपगारी फुल्ल अधिकारी होण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. आपले मानधन जमा झाले की नाही यासाठी त्यांना पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावरून हेलपाटे मारावे लागत आहेत. शासनाने अंगणवाडी सेविकांचे मानधन त्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी होत आहे.कर्जबाजारी होण्याची वेळतालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर, धनगरवाडे, डोंगरकपारीत जाऊन अंगणवाडी सेविका काम करीत आहेत. तुटपुंज्या मानधनावर समाधान मानून त्या काम करीत आहेत. मात्र, शासनाने त्यांचे मानधन दिले नसल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. केंद्र शासनाने मार्च, एप्रिलचे मानधन दिलेले नाही. शासनाने अंगणवाडी सेविकांना ३० एप्रिल २०१४ ला ९५० रुपये वाढ जाहीर केली होती. ती वाढदेखील दिलेली नाही. शासनाने चालू वर्षी दीपावलीला एक हजार रुपये भाऊबीज जाहीर केली होती, तीदेखील दिलेली नाही. आर्थिक संकटात सापडलेल्या अंगणवाडी सेविकांना कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.