शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

बेळगाव जिल्ह्यात अंगणवाडी सहाय्यीकेचा खून, मुलाचे दोन्ही डोळे फोडले, एक निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 16:11 IST

बेळगाव जिल्ह्यात गुंडेनहट्टी येथे डोकीत वार करून अंगणवाडी  सहाय्यीकेचा खून करण्यात आल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. जयश्री कल्लाप्पा बेळगावकर (वय ४०) असे या महिलेचे नाव असून या घटनेत तिचा आठ वर्षाचा मुलगा अनुराग हा देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याचे दोन्ही डोळे फोडले असून त्यातील एक कायमस्वरूपी निकामी झाला आहे. प्रथमदर्शनी हा खून कौटूंबीक वादातून झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देबेळगाव जिल्ह्यात अंगणवाडी सहाय्यीकेचा खून, मुलाचे दोन्ही डोळे फोडले, एक निकामी

खानापूर: बेळगाव जिल्ह्यात गुंडेनहट्टी येथे डोकीत वार करून अंगणवाडी  सहाय्यीकेचा खून करण्यात आल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. जयश्री कल्लाप्पा बेळगावकर (वय ४०) असे या महिलेचे नाव असून या घटनेत तिचा आठ वर्षाचा मुलगा अनुराग हा देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याचे दोन्ही डोळे फोडले असून त्यातील एक कायमस्वरूपी निकामी झाला आहे. प्रथमदर्शनी हा खून कौटूंबीक वादातून झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.बैलूर येथील कल्लाप्पा बेळगावकर यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर जयश्री दहा वर्षांपासून गुंडेहट्टी येथे माहेरीच राहत होत्या. त्या अंगणवाडीत सहाय्यीका म्हणून काम करीत उदरनिर्वाह चालवित होत्या. दहा दिवसांपूर्वी त्यांचे वडील आणि भावाशी वाद झाल्याने त्यांनी शेतवडीतील एका घरात आश्रय घेतला होता.

गावापासून जवळच असणाऱ्या या घरात त्या मुलासह राहत होत्या. अज्ञातांनी त्यांच्यावर नांगराच्या फाळाने वार करून त्यांची हत्या केली. यावेळी मारेकऱ्यांना विरोध करणारा त्यांचा मुलगा अनुराग याच्याही कपाळावर वार करण्यात आल्याने त्याचा एक डोळा कायमस्वरूपी निकामी झाला आहे.मारेकऱ्यांनी कौले काढून घरात प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी जयश्री यांच्यासह त्यांच्या मुलावर हल्ला केला. त्यात जयश्री या जागीच ठार झाल्या. अनुराग हादेखील ठार झाला असावा असे समजून मारेकरी निघून गेले. पण, तो सुदैवाने या घटनेत बचावला.

सकाळी शेतमालक नेहमीप्रमाणे गुरांचे दुध काढण्यासाठी आला असता त्याला मागील दार उघडे असल्याचे दिसले. त्यांनी जयश्री यांना हाका मारल्या, मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने आत जाऊन पाहिले असता त्या रक्तांच्या थारोळ्या पडल्याचे दिसले. जखमी अनुराग एका कोपऱ्यात कण्हत पडला होता. या घटनेची माहिती शेतीमालकांने गावकऱ्यांना दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच जखमी अनुराग याला बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचे कपाळ आणि दोन्ही डोळ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्याचा एक डोळा कायमस्वरूपी निकामी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जयश्री यांचे कुणाशीही वैर नव्हते. त्यामुळे त्यांची हत्या कुणी केली? याबाबत उलटसुलट चर्चा गुंडेनहट्टी परिसरात सुरू होती. 

नंदगड पोलिस स्थानकात घटनेची नोंद झाली असून पोलिस निरीक्षक मोतीलाल पवार आणि नंदगडच्या उपनिरीक्षक सुमा नाईक अधिक तपास करीत आहेत.  दरम्यान, या प्रकरणाचा कसोशीने तपास करून मारेकऱ्यांना तात्काळ जेरबंद करण्याची मागणी अंगणवाडी वर्कर्स युनियनने तहशिलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :Murderखूनbelgaonबेळगावkolhapurकोल्हापूर