शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

आणि तब्बल बारा दिवसानी आपटाळ प्रकाशमय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 17:05 IST

सोसाट्याचा वारा व पाऊस याची तमा न बाळगता खासगी ठेकेदार व विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यतत्परता दाखवून बारा दिवसात आपटाळ (ता . राधानगरी ) गावचा विद्युत पुरवठा पुर्ववत सुरू केला.

ठळक मुद्देआणि तब्बल बारा दिवसानी आपटाळ प्रकाशमय !विद्युत पुरवठा सुरळीत;ग्रामस्थ समाधानी

श्रीकांत ऱ्हायकरधामोड- निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात आपटाळ (ता . राधानगरी ) या गावाला विद्युत पुरवठा करणारे लोखंडी पोल ( खांब )मोडून पडल्याने तब्बल बारा दिवस हे गांव अंधाऱ्या कोठडीचे जीवन जगत होते .  या बारा दिवसामध्ये पारिसरात पावसाची संततधार होती. सोसाट्याचा वारा व पाऊस याची तमा न बाळगता खासगी ठेकेदार व विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यतत्परता दाखवून बारा दिवसात आपटाळ (ता . राधानगरी ) गावचा विद्युत पुरवठा पुर्ववत सुरू केला. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधानाचे वातावरण आहे .आपटाळ गावाला धामोड येथून केळोशी जंगलातून विद्युत पुरवठा करणारी विद्युत वाहिनी जाते . गेल्या कांही दिवसापूर्वी झालेल्या निसर्ग चक्रि वादळाच्या तडाख्यात यातील सात पोल मोडून पडल्याने ४ जूनपासून गावचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता . त्यानंतर सतत घोंघावणारा वारा व पाऊस ही विद्युत वाहीनी जोडताना अडचण करत होता. पण एका खासगी ठेकेदाराने विद्युत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकरवी बारा दिवस मेहनत करून विद्युत पुरवठा सुरू केला . विशेष म्हणजे जंगल परिसरातून जाणारी ही विद्युत वाहिका बदलून ती मुख्य रस्त्याच्या बाजूने टाकण्यात आली. त्यामुळे भविष्यात इतका मोठा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागणार नाही .दरम्यान गावातील विद्युत पुरवठा तब्बल बारा दिवस बंद झाल्याने गावातील सर्वच छोटे उद्योग बंद पडले होते .परिणामी गावातील दैनंदिन चक्रच कोलमडूले . त्यामुळे ऐन पावसाळ्यातील शेतीच्या कामांची धांदल व पिण्याच्या पाण्यापासून ते दळप- कांडप यासाठी द्यावा लागणारा वेळ यांची सांगड घालताना शेतकरी व महिला वर्गाची चांगलीच धावपळ उडाली .

मोडलेले पोल बदलण्याबरोबर लाईनचे शिफ्टींग यासाठी जवळपास एक महिन्याचा कालावधी लागणार होता . पण विद्युत विभागाचे अधिकारी , कर्मचारी व ठेकेदार यांनी चांगली कार्यतत्परता दाखवत केवळ बारा दिवसात हा खंडीत झालेला विद्युत पुरवठा पूर्ववत केला. याबद्दल ग्रामस्थातुन विद्युत मंडळाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले . 

निसर्ग चक्रिवादळाच्या टडाख्यात गावचा विद्युत पुरवण खंडीत झाला त्या बद्दल क्षमस्व . पण शेवटी 'निसर्ग ' हा निसर्ग आहे . त्यापुढे आम्ही ही हतबल झालो. पण आमचे कर्मचारी व ठेकेदार यांनी जे कष्ट घेत विद्युत पुरवठा पुर्नवत केला त्यांचेही विशेष आभार .ए .बी. तंगसाळेकनिष्ठ अभियंता, शिरगांव सबस्टेशन .

या बारा दिवसात लाईट अभावी गावकऱ्यांचे खुप हाल झाले . ऐन शेतीच्या कामाच्या धावपळीत महिलांची मोठी धावपळ उडाली . पण विद्युत विभागाने वेळाने का असेना विद्युत पुरवठा सुरु केला .आम्ही समाधानी आहोत .- कृष्णात पाटील, ग्रामस्थ आपटाळ 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर