शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात विद्रोही मराठी साहित्य संमेलन, अध्यक्षपदी आनंद पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 19:21 IST

जालना येथे १४ व १५ मार्च रोजी होणाऱ्या १५व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सांस्कृतिक तुलनाकार व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद पाटील यांची निवड करण्यात आल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देविद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आनंद पाटील जालन्यात १४ व १५ तारखेला आयोजन : प्रतिमा परदेशी

कोल्हापूर : जालना येथे १४ व १५ मार्च रोजी होणाऱ्या १५व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सांस्कृतिक तुलनाकार व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद पाटील यांची निवड करण्यात आल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.त्या म्हणाल्या, या संमेलनात जालन्यातील किशोर घोरपडे व नांदेड येथील व्यंकटेश काबदे यांना ‘विद्रोही जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. सध्या देशात हिंसेचा उन्माद माजला आहे. जात, धर्म, संस्कृतीचे मुद्दे उपस्थित करून हिंसेचे राजकारण केले जात आहे. अशा काळात ब्राह्मणी भांडवली व पुरुषसत्ताक मूल्यांचे पुनरुज्जीवन करणाºया मराठी साहित्य महामंडळ व ते भरवीत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार घालत समतावादी सांस्कृतिक पर्याय विद्रोही सांस्कृतिक चळवळीने उभा केला आहे.मूळचे कोल्हापूरचे असलेले डॉ. आनंद पाटील हे आघाडीचे सांस्कृतिक तुलनाकार व लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांची कथा-कादंबऱ्यांशिवाय मराठी दोन व इंग्रजीत एक अशी प्रवासलेखने प्रसिद्ध झाली आहेत. ‘पाटलाची लंडनवारी’चे हिंदी व कन्नडमध्ये अनुवाद झाले आहेत.

त्यांच्या ‘महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजी’ या ग्रंथाने बेस्ट सेलरचा मान मिळविला आहे. त्यांनी आजवर इच्छामरण, कणसं, कडबा, कागूद आणि सावली या कादंबऱ्या लिहिल्या. याशिवाय कथासंग्रह लिहिले आहेत. आनंदपर्व, समग्र बा. सी. मर्ढेकर, शेक्सपीअर यांच्यावर तौलनिक सांस्कृतिक समीक्षा लिहीली आहे. पश्चिमी विषारीकरण, सनातनी देशवाद, संधिसाधू लेखकांवर ते प्रहार करतात.या संमेलनात परिसंवाद, शाहिरी जलसा, कविसंमेलन व गटचर्चा होणार आहेत. तरी साहित्यप्रेमींनी या संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परिषदेस सचिव यशवंत मकरंद यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूरjalna-acजालना